पुणे – विजयादशमी निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. ही परंपरा गेल्या १७ वर्षांपासून मंदिर प्रशासन जपत आलेली आहे.विशेष या दिवशी मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येतात. सोन्याच्या साडीत सजलेल्या महालक्ष्मीच्या तेजस्वी रूपानेभक्तांना भुरळ घातली आहे