पुणे : विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून 108 मण्यांची तुळशीमाळ बनवली जाते. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तुळशीमाळ म्हणजे, जगण्याचे अगाध तत्वज्ञान असते. याच भावनेतून जसे स्त्रियांची ओळख मंगळसूत्राने होते, तसेच वैष्णवांची ओळख या तुळशीमाळेने होते. देवाला तुळस प्रिय म्हणूनच त्याच औषधी तुळशीच्या लाकडापासून बनविलेली माळ ही वारकऱ्यांचे दैवत असते. आज आपण ही तुळशीमाळ कशी बनवतात आणि तिचं महत्व काय हे जाणून घेऊया.