मुंबई : भेंडी ही एक हिरवी भाजी आहे, ही भाजी बहुतेक मुलांना आवडत नाही. पण घरातील मोठे लोक ती चवीने खातात. भेंडी ही अनेक पोषण-मूल्यांचा खजिना आहे. केवळ भेंडीच नव्हे तर भेंडीचे पाणीही आरोग्यासाठी खूप लाभदायी मानले जाते. त्यामुळे भेंडीचे पाणी कसे बनते आणि याचे फायदे काय आहेत, हे जाणून घेऊयात.