Dua Face Reveal : दीपिका-रणवीरने केली आलिया-रणबीरची कॉपी? नेटकऱ्यांनी शोधून काढले दुआ आणि राहामधले 3 कनेक्शन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood star kids : बॉलिवूडचे सर्वात लाडके जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांची लाडकी लेक दुआ पादुकोण सिंग हिचा चेहरा अधिकृतपणे जगासमोर आणला.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडचे सर्वात लाडके जोडपे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी यंदाची दिवाळी अविस्मरणीय ठरली. त्यांनी त्यांची लाडकी लेक दुआ पादुकोण सिंग हिचा चेहरा अधिकृतपणे जगासमोर आणला.
advertisement
2/8
हा गोंडस चेहरा पाहताच चाहते आनंदी झाले, पण लगेचच त्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा कपूर हिची आठवण काढली. या दोन प्रसिद्ध स्टारकिड्सच्या पहिल्या फेस रिव्हिलमध्ये चाहत्यांनी तीन मोठे कनेक्शन शोधले आहेत.
advertisement
3/8
दीपिका आणि रणवीरने 'दुआ'चा चेहरा दाखवताच लोक म्हणू लागले की, या दोघांनी रणबीर-आलियाचाच कित्ता गिरवला आहे. रणबीर-आलिया यांनी लेकी राहा कपूरला जन्मानंतर एक वर्ष आणि एक महिना पूर्ण झाल्यावर जगासमोर आणले.
advertisement
4/8
त्याचप्रमाणे, दीपिका-रणवीर यांनीही लेकी दुआला जन्मानंतर ठीक एक वर्ष आणि एक महिन्याने जगासमोर आणले आहे. दोघांनीही आपल्या बाळांना वर्षभर पापाराझींपासून दूर ठेवले.
advertisement
5/8
दुसरी आणि सर्वात मोठी कॉमन गोष्ट म्हणजे, दोन्ही जोडप्यांनी आपल्या मुलींचे चेहरे सगळ्यांना दाखवण्यासाठी सणासुदीचा शुभ मुहूर्त निवडला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी ख्रिसमसच्या मुहूर्तावर कपूर कुटुंबाच्या गेट-टुगेदरवेळी राहाची पहिली झलक पापाराझींना दिली होती.
advertisement
6/8
तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी दिवाळीच्या शुभदिनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून दुआचा फोटो शेअर केला. फेस रिव्हीलसाठी सणांचा दिवस निवडणे ही दुसरी मोठी कॉमन गोष्ट आहे.
advertisement
7/8
तिसरी आणि सर्वात गोड कॉमन गोष्ट म्हणजे, दोन्ही मुलींच्या फोटोंमध्ये त्यांच्या क्युट पोनीटेल्स दिसत आहेत. राहाच्या पोनीटेल्सची आणि तिच्या निळ्या डोळ्यांची चर्चा जगभर झाली होती, तर आता दुआच्या फोटोतही तिच्या पोनीटेल्स तिच्या गोंडसपणात भर घालत आहेत.
advertisement
8/8
फरक फक्त इतकाच राहिला की, राहाची पहिली झलक पापाराझींनी टिपली, तर दुआचा फोटो तिच्या पालकांनी स्वतः शेअर केला. दोन्ही स्टारकिड्समध्ये दोन वर्षांचा फरक असला तरी, त्यांच्या पहिल्या झलकचा टायमिंग अगदी सारखा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dua Face Reveal : दीपिका-रणवीरने केली आलिया-रणबीरची कॉपी? नेटकऱ्यांनी शोधून काढले दुआ आणि राहामधले 3 कनेक्शन