मुंबई: पित्ताचा त्रास ही सध्याच्या काळात अनेकांना जाणवत असणारी आरोग्याची समस्या आहे. पित्तदुखीलाच पित्ताशयाचे खडे असेही म्हणतात. पित्ताशयातील खडे यकृताच्या खाली राहतात आणि खूप वेदनादायक असू शकतात. पित्ताची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होतात. पित्ताशयाची ही समस्या काही घरगुती उपायांनीही कमी करता येते. याबाबत मुंबईतील आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी 7 घरगुती उपाय सांगितले आहेत.