पुण्यातून नात्यांना काळिमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्ही (TV) पाहणाऱ्या मुलाला वडिलांनी फक्त 'टीव्ही बंद कर' असे सांगितले. या एका वाक्यामुळे संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. एका क्षुल्लक गोष्टीवरून मुलाने आपले बाप-लेकाचे पवित्र नाते संपवले. या घटनेनंतर समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.