भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध दिलेल्या शांततेच्या लढ्याने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.या स्वातंत्र्य संग्रामात पुण्यातील एका ऐतिहासिक वास्तूचं विशेष महत्व आहे.पुण्यातील वडगावशेरी भागातील "आगाखान पॅलेस"या वास्तूत महात्मा गांधी 1942 ते 1944 मध्ये तब्बल 21 महिने या पॅलेस मध्ये नजर कैदेत होते.