सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव सीना नदी पात्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. सणासुदीत गावातली महिला नदी काठीजवळ जाऊन कपडे धुवायची, त्याच नदीला महापूर आल्याने अख्खा गाव आज रिकामा झाला आहे. ग्रामस्थांनी घरामध्ये साठवलेलं अन्न-धान्य सीना नदीच्या महापुराच्या पाण्यानं रस्त्याच्या कडेला वाहून आला आहे.