मराठवाड्यामध्ये झालेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांना देखील याचा दणका बसला आहे. गाई,म्हशी, शेळ्या-मेंढया, बैलजोडी बरोबर शेतकऱ्याने बघितलेली स्वप्ने मातीमोल झाली आहेत. पण मुंबई परळ येथील पशुवैद्यकीय महाविध्यालयाने आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून मदत गोळा केली आहे. मराठवाड्यामध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षकांची टीम पाठवण्यात येणार आहेत. तेथील जनावरे, पशुधन यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.