मुंबई : बदलते शहर, वाढत्या शाळांच्या फी आणि खासगी शिकवणीची सक्ती यामुळे अनेक पालक आता आपल्या मुलांसाठी होमस्कूलिंगचा (Homeschooling) पर्याय निवडताना दिसत आहेत. घरूनच अभ्यास करून शालेय शिक्षण पूर्ण करण्याची ही पद्धत गेल्या काही वर्षांत देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली आहे. कोविड काळानंतर तर या संकल्पनेला अधिक वेग आला आहे.