आपल्या देशाच्या दीर्घकाळ चालेल्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी स्विकारलेला अहिंसेचा मार्ग आणि सत्याग्रहाच्या चळवळींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. या स्वातंत्र्य चळवळीत मुंबईतील एका ठिकाणाचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. 'मणी भवन' असं वास्तूचं नाव असून याच ठिकाणी महात्मा गांधी अनेक वर्षे वास्तव्यास होते. याच वास्तूमध्ये गांधीजींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.