Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Life: बॉलिवूड आणि ओटीटी जगात आपल्या नावाने खळबळ उडवणारा अभिनेता. आज त्याचे लाखो चाहते आहेत मात्र एक वेळ अशी होती जेव्हा त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं.
advertisement
1/7

ओटीटी </a>जगात आपल्या नावाने खळबळ उडवणारा अभिनेता. आज त्याचे लाखो चाहते आहेत मात्र एक वेळ अशी होती जेव्हा त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. गाव ते चकाकणाऱ्या जगाचा रस्ता खूप कठिण होता पण त्याने हार मानली नाही. " width="1200" height="900" /> बॉलिवूड आणि ओटीटी जगात आपल्या नावाने खळबळ उडवणारा अभिनेता. आज त्याचे लाखो चाहते आहेत मात्र एक वेळ अशी होती जेव्हा त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. गाव ते चकाकणाऱ्या जगाचा रस्ता खूप कठिण होता पण त्याने हार मानली नाही.
advertisement
2/7
हरियाणातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आज सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. बॉलिवूड आणि ओटीटी वर्ल्डमध्ये मोठं नाव कमावलं आहे. हा अभिनेता कोण आहे तुम्ही गेस करु शकता का?
advertisement
3/7
साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जयदीप अहलावत आहे. कधी गायीच्या शेपटी धरून पोहायला शिकायचा, तर कधी वर्षभरासाठी फक्त एक जोडी बूट वापरायचा. पण आज तो 21 कोटींच्या आलिशान प्रॉपर्टीचा मालक आहे.
advertisement
4/7
"पाताल लोक" या मालिकेने त्याला स्टारडम दिलं. यानंतर त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. तो म्हणतो, “गावातून मुंबईत येण्याचा प्रवास अतिशय मोठा होता. शेण उचलण्यापासून ते 7-स्टार हॉटेलच्या छतावर पार्टी करण्यापर्यंत सर्व अनुभव माझ्याकडे आहेत. हेच संदर्भ मला अभिनयासाठी ताकद देतात.”
advertisement
5/7
15 वर्षे तो छोट्या 2 बीएचके घरात राहत होता. पण आता त्याने अंधेरी पश्चिमेतील पूर्णा अपार्टमेंट प्रकल्पात तब्बल 2 आलिशान फ्लॅट्स विकत घेतले आहेत. प्रत्येकी 10 कोटी किंमतीचे हे फ्लॅट्स पत्नी ज्योती हुडा यांच्या नावावर नोंदवले आहेत. नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी धरून गुंतवणूक 21.2 कोटींवर गेली आहे.
advertisement
6/7
फक्त घरच नाही, तर जयदीपकडे 1.32 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ जीएलएस एसयूव्ही देखील आहे. "पाताळ लोक 2" साठी त्याने तब्बल 20 कोटींचे मानधन घेतले, ज्यामुळे त्याची नेट वर्थ आता 28 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
7/7
जयदीप पुढे ‘द फॅमिली मॅन’च्या पुढील सीझनमध्ये दिसणार आहे. गावातील संघर्षमय दिवसांपासून ते मुंबईच्या लक्झरी जगातला त्याचा प्रवास हे दाखवतो की मेहनत आणि चिकाटी असेल तर काहीही शक्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या