TRENDING:

Ashwin : रिटायरमेंटचा निर्णय अश्विनवर बॅकफायर, ज्या कारणासाठी निवृत्ती घेतली तिथेच गेम ओव्हर!

Last Updated:

टीम इंडियाचा माजी स्पिनर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर आयपीएल 2025 संपल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडियाचा माजी स्पिनर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर आयपीएल 2025 संपल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली. जगभरातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने आयपीएलमधूनही संन्यास घेतल्याचं बोललं गेलं, पण आता ज्या कारणासाठी निवृत्ती घेतली तेच कारण अश्विनवर बॅकफायर झालं आहे. आयएल टी-20 स्पर्धेमध्ये अश्विनवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही.
रिटायरमेंटचा निर्णय अश्विनवर बॅकफायर, ज्या कारणासाठी निवृत्ती घेतली तिथेच गेम ओव्हर!
रिटायरमेंटचा निर्णय अश्विनवर बॅकफायर, ज्या कारणासाठी निवृत्ती घेतली तिथेच गेम ओव्हर!
advertisement

अश्विन विकला गेला नाही

अश्विन हा आयएल टी-20 च्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू बनू शकतो, असं बोललं जात होतं, पण लिलावामध्ये कोणत्याच टीमने बोली न लावल्यामुळे अश्विनला मोठा धक्का बसला आहे. 39 वर्षांच्या अश्विनने आयएल टी-20 लिलावासाठी त्याची बेस प्राईज 40 हजार डॉलर (3.5 दशलक्ष भारतीय रुपये) ठेवली होती. लिलावातील खेळाडूंमधली ही सर्वाधिक रक्कम होती, पण लीगमधल्या 6 टीमपैकी एकाही टीमने अश्विनवर बोली लावली नाही.

advertisement

अश्विन लिलावाच्या पाचव्या फेरीत

अश्विनचं नाव लिलावाच्या पाचव्या फेरीमध्ये ठेवण्यात आलं होतं अश्विनची किंमत जास्त असल्यामुळे कदाचित फ्रँचायझी आधी त्यांच्या टीम निश्चित करतील आणि त्यानंतर उरलेली रक्कम पाहून अश्विनवर पुन्हा बोली लावू शकतील, असं बोललं जात आहे. अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर ऑगस्ट 2025 मध्ये त्याने आयपीएलमधूनही निवृत्त व्हायचा निर्णय घेतला.

advertisement

आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर अश्विन जगभरातल्या प्रमुख लीगमध्ये खेळण्याच्या संधी शोधत आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरने करारबद्ध केले आहे. जानेवारी 2026 मध्ये अश्विन सिडनी थंडरकडून खेळताना दिसेल. अश्विन हा जगातल्या सर्वोत्तम स्पिनरपैकी एक मानला जातो, तसंच तो खालच्या क्रमांकाचा उपयुक्त बॅटरही आहे. अश्विनने 2009 ते 2025 दरम्यान आयपीएल खेळली, यात त्याने 220 सामन्यांमध्ये 187 विकेट घेतल्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ashwin : रिटायरमेंटचा निर्णय अश्विनवर बॅकफायर, ज्या कारणासाठी निवृत्ती घेतली तिथेच गेम ओव्हर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल