TRENDING:

Weather Alert: अजूनही सुटका नाहीच! महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट

Last Updated:
राज्यात धुवांधार बरसल्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा पुनरागमन करतोय. पाहुयात दसऱ्याच्या दिवशी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7
अजूनही सुटका नाहीच! महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट
राज्यात धुवांधार बरसल्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा पुनरागमन करतोय. पूर्व विदर्भाकडून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
advertisement
2/7
विदर्भातील सर्व तर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात दसऱ्याच्या दिवशी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
3/7
मुंबईत ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 31 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढे राहील. कोकणात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळेल.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली जिल्ह्यात हलक्या तर कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या घाट परिसरात मध्यम तर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
6/7
मराठवाड्यात चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट असून उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात मात्र सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: अजूनही सुटका नाहीच! महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल