TRENDING:

पुणेकरांनो तुमचा CCTV पण सेफ नाही, घरफोडीआधी दरोडेखोरांची नवी ट्रिक, Video पाहून पोलीसही हैराण!

Last Updated:

Pune News मागच्या काही दिवसांमध्ये घरफोडीच्या वाढणाऱ्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरोडेखोर सीसीटीव्ही निष्क्रिय करण्यासाठी वापरत असलेल्या ट्रिकमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारीबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मागच्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख आणि विशाल नगर भागामध्ये घरफोड्या, चेन स्नॅचिंग आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी किती धोकादायक आहे, हे परिसरातल्या नागरिकांनी दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येतं.
पुणेकरांनो तुमचा CCTV पण सेफ नाही, घरफोडीआधी दरोडेखोरांची नवी ट्रिक, Video पाहून पोलीसही हैराण!
पुणेकरांनो तुमचा CCTV पण सेफ नाही, घरफोडीआधी दरोडेखोरांची नवी ट्रिक, Video पाहून पोलीसही हैराण!
advertisement

दरोडेखोर दरोडा टाकण्याआधी आसपासच्या भागात असलेल्या सीसीटीव्हीवर केमिकलचा स्प्रे मारतात, ज्यामुळे सीसीटीव्ही काहीवेळापुरते अकार्यक्षम होतात, तसंच सीसीटीव्हीमधून अत्यंत धुरकट दिसू लागतं, ज्यामुळे चोरांची हालचालही दिसू शकत नाही. या स्प्रेचा इफेक्ट जवळपास अर्धा तास राहतो, तेवढ्या वेळात दरोडेखोर कसलाही आवाज न करता ऐवज लंपास करून तिथून निघून जातात. मागच्या काही महिन्यांपासून या भागात जवळपास रोज एका दरोड्याचा प्रयत्न होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

advertisement

रहिवासी चिंतेत

परिसरामध्ये वाढत असलेल्या दरोड्याच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. '15 दिवसांपूर्वी माझ्या घरातून वस्तू चोरीला गेल्या. भिंतीवरून उडी मारून काही जण शांतपणे सोसायटीमध्ये आले. मी काही दिवसांपासून मुंबईत राहत आहे. चोरांना माझा फ्लॅट रिकामा असल्याचं कळालं, त्यानंतर त्यांनी घरात घुसून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू पळवून नेल्या', असं महिलेने सांगितंल आहे.

advertisement

'माझ्या शेजाऱ्यांचे घरही फोडण्यात आलं आणि वस्तू चोरीला गेल्या. या भागातून अनेक तक्रारी आल्या आहेत. मी इकडे राहत नसले तरी या भागात घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत', असं ही महिला म्हणाली.

advertisement

घराबाहेर पडण्याची भीती

घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याने, रहिवाशांनी कामासाठीही घराबाहेर पडण्याची भीती व्यक्त केली आहे. जर आपण बाहेर गेलो तर काही चोर आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करू शकतात. बाहेर पडलो तर घरात दरोडा पडू शकतो, अशी प्रतिक्रिया परिसरातील ज्येष्ठ नागरिकाने दिली आहे.

पोलीस काय म्हणाले?

आम्हाला काही तक्रारी मिळाल्या आहेत. कोणतीही टोळी कार्यरत नसल्याचं आम्हाला आढळून आले आहे. रहिवाशांनी घाबरण्याची गरज नाही, आमची चौकशी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. 'स्प्रे मुळे सीसीटीव्ही तात्पुरते खराब होतात, पण काही सीसीटीव्ही कॅमेरे आरोपींच्या हालचाली टिपतात. पोलिसांकडे त्यांना शोधण्याच्या आणखी पद्धतीही आहेत', असं पोलीस म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो तुमचा CCTV पण सेफ नाही, घरफोडीआधी दरोडेखोरांची नवी ट्रिक, Video पाहून पोलीसही हैराण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल