या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 181 रन केले. टीम रॉबिनसनने 106 रनची खेळी केली, ज्यात 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर डॅरेल मिचेलने 23 बॉल 34 आणि बेव्हन जेकब्सने 21 बॉल 20 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून द्वारशुईसने 2 विकेट घेतल्या, याशिवाय हेजलवूड आणि मॅथ्यू शॉर्टला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
टी-20 इंटरनॅशनलमधलं स्लो शतक
या सामन्यात टीम रॉबिनसनने शतकी खेळी केली असली, तरी त्याच्या नावावर नकोसं रेकॉर्ड झालं आहे. या सामन्यात रॉबिनसनने 66 बॉलमध्ये नाबाद 106 रन केले. 65 बॉल खेळल्यानंतर रॉबिनसनचं शतक पूर्ण झालं, पण टी-20 इंटरनॅशनलमधील पूर्ण सदस्य देशाच्या खेळाडूचं हे चौथं सगळ्यात स्लो शतक होतं.
टी-20 इंटरनॅशनलमध्ये सगळ्यात स्लो शतक करण्याचा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे. स्टर्लिंगने 2021 साली झिम्बाब्वेविरुद्ध 70 बॉलमध्ये शतक केलं होतं. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील दुसऱ्या क्रमांकावर आहे. गप्टिलने 2012 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 69 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने वेन विकने 2015 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 67 बॉलमध्ये सेंच्युरी केली. इंग्लंडचा आक्रमक बॅटर जॉस बटलरने 2021 साली श्रीलंकेविरुद्ध 67 बॉलमध्ये शतक केलं होतं. यानंतर आता न्यूझीलंडच्या टीम रॉबिनसनने आज 1 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करण्यासाठी 65 बॉल घेतले.