'द लेडी इन व्हाईट' म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाणारी सिमी ग्रेवालने रावणाला एक खुलं पत्र लिहिलं आहे. बॉलिवूड, हॉलिवूड आणि विविध उद्योगांमधील सेलिब्रिटींसोबतच्या खळबळजनक मुलाखतींसाठी आणि तिच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिमी ग्रेवालने दसऱ्याच्या निमित्तानं एक पोस्ट लिहिली आणि चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
सिमीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "डिअर रावण, दरवर्षी या दिवशी आपण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. पण खरं सांगायचं तर, तुमच्या वागण्याला 'वाईट' म्हणण्याऐवजी 'छोटीशा खोडसाळपणा' म्हणायला हवा."
तुम्ही नेमकं काय केलं? मी मान्य करते की तुम्ही एका महिलेचं घाईघाईत अपहरण केलं, पण नंतर तुम्ही तिला तो आदर दिला जो आजच्या जगात महिलांना क्वचितच मिळतो. तुम्ही तिला चांगलं जेवण, राहण्याची व्यवस्था आणि महिला सुरक्षा रक्षकांनाही (जरी ती फार सुंदर नव्हती) दिली."
"तुमचा लग्नाचा प्रस्ताव खूप सभ्य होता आणि जेव्हा तो नाकारला गेला तेव्हा तुम्ही तिच्यावर अॅसिड फेकलं नाही. भगवान रामने तुम्हाला मारलं तेव्हाही तुम्हाला त्यांची माफी मागण्याची बुद्धी होती. आणि खरं सांगायचं तर, तुम्ही संसदेच्या अर्ध्या सदस्यांपेक्षा जास्त शिक्षित होता. माझ्या मित्रा, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला जाळण्यात कोणतंही वैयक्तिक वैर नाही. फक्त तो आता एक ट्रेंड बनला आहे."
दसऱ्याच्या शुभेच्छा पोस्ट व्हायरल होत आहे अभिनेत्रीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक सोशल मीडियावर खूप कमेंट करत आहेत. काही जण याला एक सर्जनशील कल्पना म्हणत आहेत, तर काही रावणाच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालत आहेत असं म्हणत आहेत.