Kantara Chapter 1 Review : कसा आहे ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1'? थरकाप उडवणारा क्लायमॅक्स, एका क्लिकवर वाचा रिव्ह्यू
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Kantara Chapter 1 Review : साऊथचा दमदार अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचा बहुप्रतीक्षित "कांतारा चॅप्टर 1" अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : साऊथचा दमदार अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचा बहुप्रतीक्षित "कांतारा चॅप्टर 1" अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कांतारा चा पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर प्रेक्षक या प्रीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आज सिनेमा रिलीज झाला असून तो प्रेक्षकांना कसा वाटला? सोशल मीडियावर काय रिव्ह्यू आहे? याविषयी जाणून घेऊया.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांचे रिव्ह्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनी विशेषतः क्लायमॅक्सचं कौतुक केलं आहे. अनेक जण म्हणत आहेत की, 'हा इंडस्ट्रीत पाहिलेला सर्वोत्तम क्लायमॅक्स आहे.'
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा चॅप्टर 1' हा केवळ 'कांतारा' (2022) या सुपरहिट चित्रपटाचा प्रीक्वल नाही, तर त्या लोककथेच्या मुळाशी घेऊन जाणारा एक भव्य आणि चित्तथरारक अनुभव आहे. पहिल्या भागाचे यश पाहता, 'चॅप्टर 1' कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
advertisement
पहिल्या भागाप्रमाणेच ऋषभ शेट्टीने या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका साकारली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची पकड तीव्र आणि दूरदृष्टीची आहे. हा चित्रपट बनवताना त्याने या कथेत जीव ओतल्याचे स्पष्टपणे जाणवते. एका प्रेक्षकाने लिहिलं, “हा अनुभव फक्त चित्रपटगृहातच घेता येईल. ऋषभ शेट्टीचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीही अप्रतिम आहेत. कथा, संगीत आणि कॅमेरावर्क त्याला वेगळ्याच उंचीवर नेतात.”
advertisement
Kantara Chapter 1 is a cinematic experience that blends myth, culture, and raw storytelling into a visually arresting spectacle. From its atmospheric world-building to Rishab Shetty’s commanding direction, every frame feels purposeful and immersive.
The film doesn’t just… pic.twitter.com/WX4Ej4CIgp
— Hughie Campbell🦇 (@Butcher_008) October 1, 2025
advertisement
Another National Award Loading... Rishabh Shetty dose it again.. lots of goosebumps moment in whole film.. @shetty_rishab#KantaraChapter1 #RishabShetty #KantaraChapter1review pic.twitter.com/R5DUcOUDal
— भाई साहब (@Bhai_saheb) October 1, 2025
एका युजरने तर लिहिलं, "ऋषभ शेट्टीला पुन्हा एकदा नॅशनल अवॉर्ड मिळणार यात शंका नाही." आणखी एका प्रेक्षकाने सांगितलं, “कथा, लोककथा, श्रद्धा आणि मानवी भावना यांचं सुंदर मिश्रण या सिनेमात आहे." 'कांतारा चॅप्टर 1' चा कॅनव्हास पहिल्या भागापेक्षा खूप मोठा आणि भव्य आहे. 125 कोटींच्या मोठ्या बजेटमुळे व्हिज्युअल्स (Visuals) आणि सेट्स (Sets) अधिक प्रभावी झाले आहेत.
advertisement
Kantara Chapter 1 Review:
The soul of the film lies in the 2nd half.
Rishab Shetty attempts some Bahubali kind sequences in the first half of #KantaraChapter1 which personally didn’t work for me. The film tested my patience in the 1st half.
But in the second half, when… pic.twitter.com/L6DABce67P
— Indhavaainko (இந்தாவாய்ங்கோ) 👊 (@indhavaainko) October 1, 2025
advertisement
रुक्मिणी वसंत (कनकवती) आणि जयराम यांनी उत्कृष्ट साथ दिली आहे. खलनायकाच्या भूमिकेतील गुलशन देवैयाह देखील प्रभावी ठरला आहे. अनेक रिव्ह्यूनुसार, चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास किंवा क्लायमॅक्स हा थरारक, भावनिक आणि व्हिज्युअली अद्भुत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kantara Chapter 1 Review : कसा आहे ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1'? थरकाप उडवणारा क्लायमॅक्स, एका क्लिकवर वाचा रिव्ह्यू