Karan Kundra : 'या क्रूर उच्चभ्रू महिला...' अनुषा दांडेकरच्या चीटिंगच्या आरोपांवर करण कुंद्रा भडकला, दिलं सणसणीत उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Karan Kundra Anusha Dandekar controversy : २०२० मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा अनुषाने करणचं नाव न घेता त्याच्यावर चीटिंगचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे संतापलेल्या करण कुंद्राने अनुषावर निशाणा साधला आहे.
advertisement
1/9

मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करण कुंद्रा आणि व्हीजे अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपनंतरही त्यांच्या नात्यातील वाद अजूनही संपलेला नाही. २०२० मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा अनुषाने करणचं नाव न घेता त्याच्यावर चीटिंगचे गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
2/9
नुकताच अनुषाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात तिने एक्स बॉयफ्रेंडवर डेटिंग ॲपच्या माध्यमातून इतर मुलींशी इंटिमेट होण्याचा आरोप केला. आता या आरोपांमुळे संतापलेल्या करण कुंद्राने इन्स्टाग्रामवर एक थेट पोस्ट लिहून अनुषावर निशाणा साधला आहे.
advertisement
3/9
करण कुंद्राने अनुषाच्या आरोपांवर मौन सोडत त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहिली होती, जी त्याने नंतर डिलीट केली. bollywoodlife.com नुसार, या पोस्टमध्ये करणने आपला तीव्र संताप व्यक्त केला.
advertisement
4/9
करण म्हणाला, “फक्त एका पॉडकास्टसाठी तीन तासांत ८७ आर्टिकल्स? आपल्या देशातील तरुण पिढीला हीच प्रेरणा देत आहोत का? हे तुमच्यासाठी मनोरंजन आहे?”
advertisement
5/9
अनुषा आणि तिच्यासारख्या महिलांच्या आरोपांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पुरुषांना कसं मानसिक त्रास होतो, हे करणने स्पष्ट केलं.
advertisement
6/9
तो म्हणाला, “हे दुर्दैव आहे की, आज या क्रूर आणि उच्चभ्रू महिला काहीही बोलू शकतात आणि त्यांना प्रशंसा मिळेल. माझ्यासारख्या पुरुषांसाठी मात्र कुठेही न्याय मागण्याची जागा नाहीये.”
advertisement
7/9
करणने आपला संघर्ष सांगताना लिहिलं की, “आम्ही छोट्या शहरातून येतो, खूप मेहनत करतो, प्रियजनांपासून दूर राहतो आणि तुमच्यातला स्पार्क पूर्णपणे संपल्याशिवाय कोणीही तुम्हाला सपोर्ट करत नाही.”
advertisement
8/9
सकाळच्या चार वाजता ही पोस्ट लिहित असल्याचे सांगून करणने आपला राग व्यक्त केला. त्याने थेट आरोप केला की, “बॉलिवूडच्या कुटुंबाशी संबंध असलेली कोणतीही महिला कोणत्याही पुरुषावर काहीही आरोप करू शकते आणि तिला कोणी प्रश्न विचारणार नाही.” करणने या संपूर्ण गोष्टीला ‘पद्धतशीर छळवणूक’ असं म्हटलं आहे.
advertisement
9/9
सध्या करण कुंद्रा अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे. ‘बिग बॉस १५’ मध्ये त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. जुन्या नात्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे आता या दोघांमध्येही तणाव वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Karan Kundra : 'या क्रूर उच्चभ्रू महिला...' अनुषा दांडेकरच्या चीटिंगच्या आरोपांवर करण कुंद्रा भडकला, दिलं सणसणीत उत्तर