Guess Who: बापरे बाप! फक्त 20 मिनिटांचे वसूल केले 9 कोटी, अभिनेत्रीने जमवली 550 कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे ती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Highest Paid Actress : एक लेडी सुपरस्टार आहे, जी एका चित्रपटासाठी कोणत्याही बड्या अभिनेत्याएवढी फी घेते. या अभिनेत्रीने केवळ २० मिनिटांच्या भूमिकेसाठी तब्बल ९ कोटी रुपये आकारले होते!
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे अभिनयाच्या बाबतीत अव्वल तर आहेतच; पण श्रीमंतीच्या बाबतीतही त्यांची बरोबरी करणे कठीण आहे. आजची अशीच एक लेडी सुपरस्टार आहे, जी एका चित्रपटासाठी कोणत्याही बड्या अभिनेत्याएवढी फी घेते.
advertisement
2/8
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या अभिनेत्रीने केवळ २० मिनिटांच्या भूमिकेसाठी तब्बल ९ कोटी रुपये आकारले होते! कोण आहे ही अभिनेत्री, जिने कमी वेळात एवढी मोठी कमाई केली?
advertisement
3/8
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, ती आहे दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची लेक आलिया भट्ट!
advertisement
4/8
आलियाने आपल्या १३ वर्षांच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. तिच्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भूमिकेची ही गोष्ट आहे. हा चित्रपट म्हणजे एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’!
advertisement
5/8
मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात साऊथचे सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत होते. यात आलियाने ‘सीता’ नावाचं छोटंसं पण प्रभावी पात्र साकारलं होतं.
advertisement
6/8
तिची स्क्रीनवरील उपस्थिती फक्त २० मिनिटांची होती, पण त्यासाठी तिने घेतलेली ९ कोटी रुपयांची फी ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता!
advertisement
7/8
आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये गणली जाते. २०१२ पासून लीड ॲक्ट्रेस म्हणून काम करत असलेल्या आलियाची एकूण नेटवर्थ तब्बल ५५० कोटी रुपये आहे!
advertisement
8/8
ती केवळ एका चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रुपये आकारते. चित्रपटांसोबतच ब्रँड एंडोर्समेंट्स हा तिच्या कमाईचा मोठा स्रोत आहे. आलिया एका जाहिरातीसाठी चक्क ५ ते ७ कोटी रुपये वसूलते. पती रणबीर कपूरसोबत ती मुंबईत आलिशान आयुष्य जगत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: बापरे बाप! फक्त 20 मिनिटांचे वसूल केले 9 कोटी, अभिनेत्रीने जमवली 550 कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे ती?