'...तेव्हा त्यांची फाफलते!' मराठीमध्येही TV विरुद्ध Films? तेजश्री प्रधानने घेतली मालिकांची बाजू, सिनेकलाकारांना धरलं धारेवर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tejashree Pradhan : टेलिव्हिजन मालिकेच्या कामावर आणि गुणवत्तेवर वारंवार होणाऱ्या टीकेवर तेजश्रीने नुकतंच एका मुलाखतीत मौन सोडलं असून, तिने मालिकाविश्वाची भक्कम बाजू मांडली आहे.
advertisement
1/8

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि ठाम मतांमुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजन मालिकेच्या कामावर आणि गुणवत्तेवर वारंवार होणाऱ्या टीकेवर तेजश्रीने नुकतंच एका मुलाखतीत मौन सोडलं असून, तिने मालिकाविश्वाची भक्कम बाजू मांडली आहे.
advertisement
2/8
टेलिव्हिजनवर सतत काम करण्यामागचं कारण सांगताना तेजश्रीने एक महत्त्वाचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी नाटक करत असताना माझे सहकलाकार प्रशांत दादा एकदा सहज बोलून गेले की, तेजू, जे माध्यम आपल्याला बोलावतं ना, त्याच्याकडे पाठ नाही फिरवायची! ते वाक्य मी आजही विसरले नाहीये.”
advertisement
3/8
तेजश्रीसाठी टेलिव्हिजन हे माध्यम तिच्या आयुष्यात अगदी करेक्ट ठरलं आहे आणि म्हणून ती या माध्यमापासून कधीच लांब गेली नाही, असं तिने स्पष्ट केलं.
advertisement
4/8
टीव्ही मालिकेतील कामाच्या प्रचंड वेगाबद्दल बोलताना तेजश्रीने सिनेमातील कलाकारांना थेट चॅलेंज दिलं. ती म्हणाली की, सुबोध भावेच्या एका मताशी ती पूर्णपणे सहमत आहे.
advertisement
5/8
ती म्हणाली, “हे जे फक्त सिनेमे करणारे कलाकार आहेत ना, ते जेव्हा टेलिव्हिजनला येतात, तेव्हा त्यांच्यासमोर ‘हा घ्या सीन, पंधरा मिनिटांत शॉट रेडी होईल’ असं म्हटलं की त्यांची पुरती फापलते!”
advertisement
6/8
टेलिव्हिजनमध्ये आम्ही दिवसाला पंधरा किंवा वीस सीन सुद्धा करतो. कधीकधी सेटवर गेल्यावर सीन लिहिला जातो, तो बदलला जातो आणि दिग्दर्शकालाही वेळ नसतो. अशा परिस्थितीत, तुमच्या मेंदूला विचारांचा आणि प्रोसेसचा जो स्पीड मिळतो, तो मॅच करणं सोपं नाहीये!
advertisement
7/8
टीव्ही मालिकेवर होणाऱ्या तर्काच्या टीकेवरही तिने उत्तर दिलं. “कदाचित टेलिव्हिजनमध्ये सिनेमाएवढा लॉजिकली विचार केला जात नसेल, पण हा विचार केला जातो की, तितका लॉजिकली विचार न करणारी माणसं हे माध्यम पाहतात!”
advertisement
8/8
या माध्यमाचं महत्त्व पटवून देताना तेजश्री शेवटी म्हणाली, “टेलिव्हिजनबद्दल खूप सहज बोललं जातं, पण जेव्हा कोरोना आला, तेव्हा टेलिव्हिजनने प्रत्येक इंडस्ट्रीला तारलं होतं. तुम्हाला तुमचा करोडो रुपयांचा सिनेमा प्रोमोट करायला टीव्हीवर यावं लागतं, याचा अर्थ ते माध्यम तुम्हाला जेवढं अप्रगल्भ वाटतं, तितकं ते नक्कीच नाहीये!”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'...तेव्हा त्यांची फाफलते!' मराठीमध्येही TV विरुद्ध Films? तेजश्री प्रधानने घेतली मालिकांची बाजू, सिनेकलाकारांना धरलं धारेवर