भरधाव एसटीबसचा अचानक ब्रेक फेल, पुढे जे झालं ते भयंकर, सोलापुरात 25 प्रवाशांसोबत घडला थरार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बार्शीहून सोलापूरकडे येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाला, पण चालकाच्या सतर्कतेमुळे बाळे परिसरात २५ प्रवासी सुखरूप वाचले. पोलीस आणि एसटी महामंडळ तपास करत आहेत.
advertisement
1/7

प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: शहरामध्ये आज एका एसटी बसचा भीषण अपघात होता होता टळला आहे. बार्शीहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या एका एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाला. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या असाधारण सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
advertisement
2/7
बसमधील तब्बल २५ प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हा अपघात सोलापूर शहरातील बाळे परिसरातील संतोष नगरजवळ घडला. एसटी बस बार्शीकडून सोलापूरकडे येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.
advertisement
3/7
बस वेगात असल्याने आणि नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ कमी असल्याने, चालकाने प्रसंगावधान राखले. बसवरील नियंत्रण सुटत असल्याचे दिसताच, चालकाने रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर बस चढवली.
advertisement
4/7
वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतानाच, बस डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या बाजूला एका कारला धडकली. धडक बसल्यामुळे बसचा वेग कमी झाला आणि मोठा अपघात टळला. अपघातग्रस्त एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते.
advertisement
5/7
अपघातानंतर लगेचच प्रवासी आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही, सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना किरकोळ धक्के लागले आहेत.
advertisement
6/7
एसटी चालकाच्या या धाडसामुळे आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळेच मोठी जीवितहानी टळली, असे नागरिकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला आहे.
advertisement
7/7
ब्रेक फेल होण्याचे नेमके कारण काय होते आणि हा अपघात कशामुळे घडला, याचा पुढील तपास पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भरधाव एसटीबसचा अचानक ब्रेक फेल, पुढे जे झालं ते भयंकर, सोलापुरात 25 प्रवाशांसोबत घडला थरार