TRENDING:

मुलांच्या हट्टासाठी पैसे खर्चण्याची गरज नाही, आता लायब्ररीत मिळणार खेळणी

Last Updated:
काही पालकांना महागडी खेळणी घेणं परवडत नाही. पण, आता पालकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही.
advertisement
1/9
मुलांच्या हट्टासाठी पैसे खर्चण्याची गरज नाही, आता लायब्ररीत मिळणार खेळणी
लहान मूलांच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळणी. मुलांना प्रत्येक प्रकारची खेळणी हवी असतात. काही क्षणांपूर्वी गाडीशी खेळणारे मुल अचानक कोडी सोडवणाऱ्या खेळणीचा हट्ट करते. त्यांचे बाल हट्ट पुरवताना घरातल्या सर्वांची तारांबळ उडते. काही पालकांना महागडी खेळणी घेणं परवडत नाही. त्यामुळे मुलांची समजूत कशी घालावी हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. पण, आता पालकांना काळजी करण्याची आवश्यकता नाही.
advertisement
2/9
मुलांच्या हट्टासाठी पैसे खर्चण्याची गरज नाही, आता लायब्ररीत मिळणार खेळणी
<a href="https://news18marathi.com/maharashtra/thane/">डोंबिवलीतील</a> आयटी प्रोफेशनल तरुण हर्षल वगळ हा गेल्या दहा वर्षांपासून पुस्तकांच्या लायब्ररीप्रमाणे खेळण्याची लायब्ररी चालवत आहेत.विशेष म्हणजे त्याची ही लायब्ररी आता लवकरच ऑनलाईन सुरू होणार असून त्याचे खास ॲप तयार केले आहे.
advertisement
3/9
मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा हर्षल यांचा विचार होता. पण, या प्रकारच्या शाळा सगळीकडं आहेत. त्यामुळे ‘टॉय लायब्ररी’ सुरू करण्याचं हर्षलनं ठरवलं. हर्षल यांच्याकडे साडेतीन हजारांपेक्षा जास्त खेळणी आहेत. त्यामध्ये पझल, गाड्या, अक्षर ओळख, लाकडाची खेळणी, वैज्ञानिक जोडणी असणारी खेळणी अशा वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे.
advertisement
4/9
मुलांना फक्त खेळणी न देता त्यांच्यासाठी वेगवेगळे कलात्मक वर्कशॉप देखील हर्षल यांच्या ‘चाणक्य लायब्ररी’कडून घेतले जातात. हर्षल यांची पत्नी निकिता वागल हे वर्कशॉप घेतात. त्यामुळे मुलांकडून गणपती बनवून घेणे, त्यांना वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवयाला शिकवणे यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी असा त्यामागील उद्देश असतो, अशी माहिती निकिता यांनी दिली.
advertisement
5/9
श्रीधर शेट्टी हे स्वतः या लायब्रररीचे सदस्य होते. मात्र आपण हर्षल तना काही मदत करावी या उद्देशाने कन्सल्टंट म्हणून मी लायब्ररीमध्ये रुजू झालो. आता महिन्याभरात एक ऑनलाईन ॲप सुरू होणार असून यामुळे ज्या महिलांना आपल्या लहान मुलांसाठी नोकरी सोडावी लागली अशा महिलांना पुन्हा वेगवेगळ्या शहरात काम करण्याची संधी मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
6/9
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत चाणक्य या नावाने लायब्ररीचा ॲप सुरू होणार आहे. यामध्ये तुमच्या शहराच नाव टाकल की आजूबाजूला असणाऱ्या लायब्ररीच्या शाखा तुम्हाला दिसतील आणि कोणती खेळणी आहेत. कोणती खेळणी सध्या उपलब्ध नाहीत पण लायब्ररीत उपलब्ध आहेत हे या माध्यमातून समजेल.
advertisement
7/9
पुस्तक जशी घरी जाऊन वाचू शकतो त्याचप्रमाणे ही खेळणी देखील घरी घेऊन जाऊ शकतो. पुन्हा पंधरा दिवसांनी आणून द्यायची आणि दुसरी खेळणी घेऊन जायची असे त्यांनी सांगितले.
advertisement
8/9
ही लायब्ररी एकता नगर मध्ये असल्याची माहिती हर्षल यांनी दिली. दीड वर्षांपासून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी नाना प्रकारच्या खेळण्यांचे भांडार या लायब्ररीमध्ये आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या पांडूरंगवाडी येथील या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर एखाद्या टॉय टाऊनमध्ये गेल्याचा भास होतो.
advertisement
9/9
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ठाणे/
मुलांच्या हट्टासाठी पैसे खर्चण्याची गरज नाही, आता लायब्ररीत मिळणार खेळणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल