Weather Update : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, गारपीट होणार, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठवाड्यात 7 एप्रिलपासून वातावरणात बदल जाणवत आहेत. 9 एप्रिल रोजी पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तर पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
advertisement
1/5

गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या कडाक्यासह पावसानेही हजेरी लावली आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरीही विदर्भासह काही भागात पावसाचे वातावरण आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात विदर्भासह इतर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
2/5
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाने येण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
येत्या २४ तासात अकोला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियात पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसात बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/5
विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या चार दिवसांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन्हीकडे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात 7 एप्रिलपासून वातावरणात बदल जाणवत आहेत. 9 एप्रिल रोजी पारा 37 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तर पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता कमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, गारपीट होणार, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट