Weather Update : राज्यातून थंडी गायब! उकाडा वाढला, या भागांमध्ये पावसाचा अंदाज
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
राज्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे थंडीही कमी होत असून उन्हाचा चटका वाढला आहे.
advertisement
1/6

राज्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. याच्या परिणामामुळे थंडी गायब होत असून आता ऊन आणि उकाड्यात वाढ होताना दिसत आहे
advertisement
2/6
तर, विदर्भ तसंच मराठवाड्यात सध्या पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शुक्रवारपासून म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/6
मध्य प्रदेशापासून ते विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयात झाला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
advertisement
4/6
उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. तर काही ठिकाणी पाऊसही पडतोय. मात्र, महाराष्ट्रात थंडी गायब झाल्याचं चित्र आहे. पहाटेच्या वेळी थंडी जाणवते. मात्र दुपारी उन्हाचा चटका सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे
advertisement
5/6
हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधील थंडीमुळे महाराष्ट्रात काही भागात थंडी जाणवू शकते.
advertisement
6/6
राज्यात 11 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील आणि त्यानंतर थंडी निरोप घेईल, असा अंदाज हवामान खात्याने याआधीच वर्तविला आहे. अशातच, आता थंडी कमी होऊन उन्हाचा चटका वाढण्यास सुरूवात झाली आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यातून थंडी गायब! उकाडा वाढला, या भागांमध्ये पावसाचा अंदाज