North Maharashtra Lok Sabha: 7 मंत्री 1 केंद्रीय मंत्री असून सुद्धा उत्तर महाराष्ट्राने का नाकारलं महायुतीला? मोठं कारण समोर
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नाशिक (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी): नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी सहा जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. तर महायुतीचा उत्तर महाराष्ट्रातून जवळपास सुपडा साफ झाला आहे.
advertisement
1/7

महायुतीचे उत्तर महाराष्ट्रात 7 मंत्री आणि 1 केंद्रीय मंत्री असताना त्यांचा झालेला दारुण पराभव महाविकासआघाडीला मात्र नवसंजीवनी देणारा ठरला. उत्तर महाराष्ट्रात महाविकासआघाडीला कुठे फायदा झाला आणि महायुतीचं नेमकं कुठे गणित बिघडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
advertisement
2/7
नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, रावेर, दिंडोरी आणि शिर्डी हे उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघ. या आठ लोकसभा मतदारसंघांपैकी सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकासआघाडीचा झेंडा फडकला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा मतदारसंघ वगळता नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर, नंदुरबार, धुळे या सहा मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळालं आहे.
advertisement
3/7
याच उत्तर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवार यांनाही पराभव स्वीकारावा लागला. पक्ष फोडाफोडीतून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केलेला विचका आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला चुकीचा वापर, मराठा आरक्षण या मुद्द्यांनी यंदाची निवडणूक जनतेने हातात घेतल्याने महायुतीला इतक्या मोठ्या पराभवाला सामोर जावं लागल्याचं बोललं जात आहे.
advertisement
4/7
छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, दादा भुसे, विजयकुमार गावित अशा दिग्गज नेत्यांची फौज महायुतीकडे होती.
advertisement
5/7
मात्र, महाविकास आघाडीकडे निष्ठावान पक्षाच्या कार्यकर्त्यांची फौज, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक असलेल्या मराठा मतदारांची नाराजी, संविधान धोक्यात आहे या विरोधकांच्या प्रचारामुळे अल्पसंख्यांक आणि दलित समाज यांचा महायुतीला वाढलेला विरोध ही सगळी कारणं महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाची मुख्य कारण ठरली. तर नाशिक, नगर, दिंडोरी, धुळे या चार लोकसभा मतदारसंघात कांद्याच्या निर्यात शुल्काचीही मोठी किंमत महायुतीला मोजावी लागली.
advertisement
6/7
2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली. मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्ष फोडाफोडीतून निर्माण झालेली सहानुभूतीची लाट दिसून आली. नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा एक सामान्य शिक्षक असलेल्या भास्कर भगरे यांनी पराभव केला.
advertisement
7/7
धुळ्यात माजी मंत्री असलेल्या सुभाष भामरे यांचा शोभा बच्छाव यांनी पराभव केला नंदुरबार मध्ये मंत्र्यांची मुलगी असलेल्या हिना गावित यांचा गोवाल पाडवी यांनी पराभव केला, अहमदनगर मध्ये राज्याच्या महसूल मंत्र्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांनी पराभव केला तर शिर्डीत सदाशिव लोखंडे यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
North Maharashtra Lok Sabha: 7 मंत्री 1 केंद्रीय मंत्री असून सुद्धा उत्तर महाराष्ट्राने का नाकारलं महायुतीला? मोठं कारण समोर