TRENDING:

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महा-कोंडी; तासनतास वाहनांच्या रांगा, प्रवासी हतबल

Last Updated:
Mumbai Goa Highway : मुंबई–गोवा महामार्गावर माणगाव शहराजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते खरवली फाटा दरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
advertisement
1/7
मुंबई-गोवा महामार्गावर महा-कोंडी; तासनतास वाहनांच्या रांगा, प्रवासी हतबल
मुंबई–गोवा महामार्गावर गेल्या काही तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. माणगाव शहराजवळ ही कोंडी झाल्याने पर्यटक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
advertisement
2/7
माणगाव शहरापासून खरवली फाट्यापर्यंत सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सध्या या वाहतूककोंडीचे फोटोही समोर आलेले आहेत.
advertisement
3/7
शनिवार आणि रविवारच्या वीकेंडसाठी अनेक पर्यटक मुंबई आणि आसपासच्या भागातून कोकणाकडे निघाले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे माणगाव शहराजवळ वाहतूक मंदावली आणि काही वेळातच मोठी कोंडी झाली.
advertisement
4/7
मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कार, बस, पर्यटकांची खासगी वाहने आणि मालवाहू वाहनांची गर्दी दिसून आली.
advertisement
5/7
अनेक वाहनांना दीर्घकाळ रस्त्यावरच थांबावे लागले. त्यामुळे प्रवाशांना उकाडा आणि वाहतुकीचा त्रास सहन करावा लागला.
advertisement
6/7
माणगाव ते खरवली या दरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
advertisement
7/7
वीकेंडमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मुंबई–गोवा महामार्गावर अशा प्रकारच्या कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महा-कोंडी; तासनतास वाहनांच्या रांगा, प्रवासी हतबल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल