TRENDING:

Weather Alert: ऐन हिवाळ्यात वारं फिरलं, किमान आणि कमाल तापमानात मोठे बदल, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: उत्तरेतील शीतलहरींचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
ऐन हिवाळ्यात वारं फिरलं, किमान आणि कमाल तापमानात मोठे बदल, आजचं हवामान अपडेट
डिसेंबरच्या दिवसांत साधारणपणे जाणवणारी कडाक्याची थंडी सध्या फारशी जाणवत नाही. 18 डिसेंबर रोजीही मुंबई, ठाणे तसंच पुणे आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहणार असून सकाळी हलका गारवा आणि दिवसा उन्हामुळे उबदार वातावरण राहणार आहे. थंड हवेचा प्रवाह कमकुवत असल्याने थंडीचा प्रभाव मर्यादित असून तापमान सरासरीच्या आसपासच राहात आहे. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर आज सकाळी तापमान साधारण 20 ते 22 अंशांच्या दरम्यान आहे. कालप्रमाणेच आजही थंडी फारशी जाणवत नाही. दिवसा तापमान 31 ते 32 अंशांच्या आसपास राहणार असल्याने उन्हाची तीव्रता जाणवू शकते. समुद्राकडून येणाऱ्या दमट हवेमुळे या भागांत गारवा मर्यादितच राहिला आहे. पुढील दोन दिवसांतही या भागात हवामान साधारण असंच राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरात आज सकाळी तापमान 18 ते 20 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. दिवसा तापमान 30 ते 31 अंशांपर्यंत वाढेल. मागील दिवसांच्या तुलनेत थंडीमध्ये विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे सकाळी आणि रात्री थोडा गारवा, तर दिवसा उन्हाचा प्रभाव जाणवणार आहे.
advertisement
4/5
पुणे शहरात आज सकाळी तापमान 14 ते 15 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील काही दिवसांत जशी थंडी जाणवत होती, तशीच आजही राहणार आहे, मात्र ती कडाक्याची नसेल. दिवसा तापमान 29 ते 30 अंशांपर्यंत वाढेल. आज पुण्यात हवामान कोरडे राहणार असल्याने दिवसा नागरिकांना उन्हाचा चटका बसू शकतो .
advertisement
5/5
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत सकाळी तापमान 12 ते 15 अंशांपर्यंत खाली येऊ शकते. मात्र दिवसा तापमान 30 ते 32 अंशांच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे थोडी थंडी जाणवेल, पण दिवसा हवामान उबदार राहणार आहे. एकंदरीत, सकाळी हलका गारवा आणि दिवसा उबदार हवामान अशी स्थिती राज्यातील बहुतांश भागांत कायम असून पुढील काही दिवसांतही मोठा हवामान बदल होण्याची शक्यता नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: ऐन हिवाळ्यात वारं फिरलं, किमान आणि कमाल तापमानात मोठे बदल, आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल