TRENDING:

आजचं हवामान: बाप्पासोबत पावसाचा मुक्काम, कोकणात धो धो सुरूच, मुंबईसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Mumbai Rain: गुरुवारी मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहाणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
बाप्पासोबत पावसाचा मुक्काम, कोकणात धो धो सुरूच, मुंबईसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
गणेशोत्सव सुरू असताना पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. किमान तापमान 25 अंश सेल्सियस तर कमाल 30 अंश राहण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबईत सकाळच्या वेळेत रिमझिम पाऊस, तर दुपारनंतर मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तापमान 24 ते 31 अंश सेल्सियस दरम्यान राहील. वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ हवामान राहणार असून पावसाच्या जोरदार सरी पडतील. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/5
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज पावसाचा जोर अधिक राहणार आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर सिंधुदुर्गात हलक्या सरा पडतील. समुद्रकिनारी आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
आजचं हवामान: बाप्पासोबत पावसाचा मुक्काम, कोकणात धो धो सुरूच, मुंबईसह 6 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल