Mumbai Rain: ऐन पावसाळ्यात घामाच्या धारा, मुंबईकर हैराण, ठाण्यात विचित्र हवामान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने उघडीप दिली असून उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणेकर हैराण आहेत. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज इथं पाहा.
advertisement
1/5

ऋतू पावसाळ्याचा असला तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवतो आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून बरसत आहेत. तरीही वातावरणात दमटपणा आणि उकाडा कायम आहे. ऐन पावसाळ्यातही मुंबईकरांना घामाच्या धारांनी हैराण केलं आहे. आज 5 ऑगस्ट 2025 रोजीही हेच हवामान पाहायला मिळणार असून, जोरदार पावसाची शक्यता फारशी नाही.
advertisement
2/5
मुंबई शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ राहील. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास हलक्याशा सरी पडू शकतात, मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. हवामानात दमटपणा अधिक असल्यामुळे उकाडा अधिक जाणवेल. कमाल तापमान सुमारे 30°C, तर किमान तापमान 27°C दरम्यान राहील. लोकल सेवा आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहण्याची शक्यता आहे, मात्र उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. संध्याकाळी वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता असून, ढगाळ हवामान कायम राहील. उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30–31°C, तर किमान तापमान 25–27 C दरम्यान राहील. या भागात जोरदार पावसाचा अंदाज नसला तरी अधूनमधून सरींची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
4/5
पालघर जिल्ह्यात आज आंशिक ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणीच हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उष्णता अधिक जाणवेल. कमाल तापमान 31°C, तर किमान तापमान 25-26°C दरम्यान राहील. पावसाचा जोर नसल्यामुळे जनजीवन सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.
advertisement
5/5
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता फारशी नाही. काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाचा कोणताही इशारा नाही. कमाल तापमान 30–31°C, तर किमान तापमान 24–25°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढेल आणि उष्णता जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Rain: ऐन पावसाळ्यात घामाच्या धारा, मुंबईकर हैराण, ठाण्यात विचित्र हवामान