Weather Alert: मुंबईकर आज छत्री सोबत ठेवा, कोकणात पुन्हा धो धो कोसळणार, IMD चा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून कोकणात पाऊस पुन्हा आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबईसह ठाण्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/4

महाराष्ट्रात आज हवामानाचे चित्र थोडे बदललेले दिसणार आहे. काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला होता, तापमानाचा पारा चढला होता आणि अनेक ठिकाणी कोरडे हवामान होते. परंतु आजपासून ढग पुन्हा एकदा परतले आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून सिंधुदुर्गातही मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
2/4
मुंबईत आज हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार आहे. सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहील आणि अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू राहील. गेल्या काही दिवसांच्या उकाड्यापासून आज नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर थोडा वाढू शकतो
advertisement
3/4
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडतील. सकाळच्या सुमारास हवेत गारवा जाणवेल, तर दुपारनंतर काही भागात रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, बेलापूर या परिसरात दुपारच्या सुमारास हलक्या सरींचा अनुभव येऊ शकतो. ठाण्यात कल्याण, डोंबिवली, घोडबंदर मार्ग आणि कळवा परिसरात पावसाचा थोडा जोर जाणवेल.
advertisement
4/4
पालघर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरडे वातावरण असलेल्या या भागात आज ढगाळ वातावरणासोबत सरींचा अनुभव येईल. दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर किंचित वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: मुंबईकर आज छत्री सोबत ठेवा, कोकणात पुन्हा धो धो कोसळणार, IMD चा अलर्ट