दादर स्टेशनवर रोज प्रवाशांची मदत करणारा मुंबईकर पाहिलाय? जाणून घ्या हेतू
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मुंबईत लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. याच लोकांसाठी मुंबईकर पाटील रोज मोठं काम करतोय.
advertisement
1/7

मुंबईत कामानिमित्ताने आणि पर्यटनाच्या दृष्टीने लाखो नागरिक येत असतात. अशातच या सर्वांना प्रवासासाठी <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईची</a> लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईच्या लोकल सेवेची मदत होते. मात्र कोणती ट्रेन पकडून आपलं गंतव्य स्थान गाठावं हे अनेकांना कळत सुद्धा नाही.
advertisement
2/7
दिवसेंदिवस मुंबईची आणि मुंबईच्या स्थानकांची होणारी प्रगती पाहता अनेक गोष्टी बदलल्या असून कधी कधी मुंबईकरांनाही प्रश्न पडतो. नेमकी रेल्वे पकडायची कुठं? हे सर्व लक्षात घेऊन वरळीतील नरेंद्र पाटील यांनी अनोखा संकल्प केला. ज्याचा रोज हजारो लोकांना फायदा होतोय.
advertisement
3/7
मुंबईच्या लोकल मधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अशातच अनेकांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होतात. मुंबईतील दादर स्थानक हे गजबजलेल्या स्थानकांपैकीच एक स्थानक आहे. या स्थानकातून दिवसात जवळपास दोन लाख प्रवासी प्रवास करत असतात.
advertisement
4/7
सध्या स्थानकाचा पुनर्विकास होत असून नवीन तयार झालेल्या पदाचारी मार्गावर दिशादर्शक नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळेच तिथून प्रवास करणारे नरेंद्र पाटील यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी दररोज दोन तास दादर स्थानकावर उभे राहून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
advertisement
5/7
वरळीत राहणारे नरेंद्र पाटील हे एका खाजगी कंपनीत कर्मचारी आहेत. मात्र दररोज प्रवास करताना या प्रवासादरम्यान अनेक प्रवासी त्यांना कोणत्या फलाटावर ट्रेन येईल हे विचारत होते. यावेळी पाटील यांच्या लक्षात आलं की दादर फुल मार्केट जवळ असलेल्या पदचारी पुलावर दिशादर्शक ( इंडिकेटर ) नसल्यामुळे प्रवाशांना ही अडचण जाणवत आहे.
advertisement
6/7
पाटील यांच्या ही बाब लक्षात आली. तेव्हापासून ते दररोज कामावर जाण्याच्या आधी दोन तास दादर स्टेशनवर लोकांची निशुल्क सेवा करतात. वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ते लोकांना रेल्वेबाबत माहिती देत आहेत. त्याचा प्रवाशांना फायदा होतोय.
advertisement
7/7
अनेकांना मध्य आणि पश्चिम रेल्वे बद्दल माहिती नसल्यामुळे ट्रेन पकडण्यात गडबड होते. त्यामुळे अनेकांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यात देखील उशीर होतो. अशावेळी प्रवाशांना माझी मदत होते. त्यामुळे दररोज सकाळी दोन तास दादर येथील पादचारी पुलावर उभा राहून मी लोकांची सेवा करत असतो. रेल्वेने या पुलावर मार्गदर्शक फलक लावून लोकांचे अडचण सोडवावी एवढीच इच्छा आहे, असे नरेंद्र पाटील म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
दादर स्टेशनवर रोज प्रवाशांची मदत करणारा मुंबईकर पाहिलाय? जाणून घ्या हेतू