TRENDING:

Weather update : राज्यात थंडीला सुरुवात; 'या' भागात आजही पडणार पाऊस

Last Updated:
मिचॉंग चक्रीवादाळाचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे देशाता हळूहळू थंडी वाढताना दिसत आहे. मात्र तरी देखील काही राज्यांमध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5
Weather update : राज्यात थंडीला सुरुवात; 'या' भागात आजही पडणार पाऊस
नवी दिल्ली 12 डिसेंबर : मिचॉंग चक्रीवादाळाचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे देशाता हळूहळू थंडी वाढताना दिसत आहे. देशातील बहुतांश राज्यातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उत्तर भारतामध्ये येत्या 15 डिसेंबरनंतर तापमनात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आसाम, मेघालाय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये दाट धुक्यांसह गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
advertisement
3/5
आजही काही रांज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसचा अंदाज आहे.
advertisement
4/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास मिचॉंग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला आहे, मात्र तरी देखील पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/5
राज्यामध्ये कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे, तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. दुसरीकडे राज्याच्या काही भागात येत्या काही दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता देखील आहे. पुणे आणि मुंबईमध्ये तापमानात काही अंशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather update : राज्यात थंडीला सुरुवात; 'या' भागात आजही पडणार पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल