TRENDING:

समुद्रात जाऊ नका! मुंबईला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना BMC कडून अलर्ट

Last Updated:
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी करून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
समुद्रात जाऊ नका! मुंबईला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना BMC कडून अलर्ट
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महापालिकेने एक निवेदन जारी करून मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देत समुंद्रकिनारी फिरायला न जाण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
advertisement
2/5
दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान सलग ३ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
3/5
यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी ५.०३ उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबई पोलिसांद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात येत आहे.
advertisement
4/5
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे येणाऱ्या अनुयायांनीदेखील समुद्रकिनारी योग्य खबरदारी बाळगावी.
advertisement
5/5
दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतींचे वेळापत्रक... १. गुरुवार, दि. ०४.१२.२०२५ - रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची - ४.९६ मीटर २. शुक्रवार, दि. ०५.१२.२०२५ सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची - ४.१४ मीटर ३. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची - ५.०३ मीटर ४. शनिवार, दि. ०६.१२.२०२५ -दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची - ४.१७ मीटर ५. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची - ५.०१ मीटर ६. रविवार, दि. ०७.१२.२०२५ -दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची - ४.१५ मीटर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
समुद्रात जाऊ नका! मुंबईला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना BMC कडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल