TRENDING:

आधी गुपचूप उरकलं लग्न, आता राज निदिमोरुकडून समंथाला महागडं गिफ्ट, किंमत इतकी की तुम्ही कधी विचारही केला नसेल!

Last Updated:
Samantha Prabhu Second Marriage: लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिल्यानंतर, आता राज निदिमोरूने समंथाला दिलेल्या आलिशान आणि महागड्या भेटवस्तूची चर्चा सुरू झाली आहे!
advertisement
1/9
आधी गुपचूप उरकलं लग्न,आता राज निदिमोरुकडून समंथाला महागडं गिफ्ट,किंमत इतकी की...
मुंबई: 'द फॅमिली मॅन' सिरीजचे सह-दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी १ डिसेंबर रोजी गुपचूप लग्न केल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या दुसऱ्या इनिंगमुळे चर्चेत आहे.
advertisement
2/9
लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिल्यानंतर, आता राज निदिमोरूने समंथाला दिलेल्या आलिशान आणि महागड्या भेटवस्तूची चर्चा सुरू झाली आहे!
advertisement
3/9
राज निदिमोरूने आपल्या नववधूला करोडो रुपयांचे मोठे गिफ्ट दिले असल्याची बातमी एका रिपोर्टमधून समोर आली आहे. समंथा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष समंथाच्या डायमंड वेडिंग रिंगने वेधले होते.
advertisement
4/9
समंथाच्या या खास डायमंड रिंगची किंमत जवळपास १.५ कोटी रुपये इतकी सांगितली गेली होती. पण आता या महागड्या अंगठीव्यतिरिक्त, राजने आपल्या पत्नीला आणखी एक मोठी लक्झरी भेट दिली आहे.
advertisement
5/9
AsiaNet च्या रिपोर्टनुसार, राज निदिमोरूने 'मुंह दिखाई' विधीमध्ये समंथाला हैदराबादमधील जुबली हिल्स येथील एका सुंदर घर भेट म्हणून दिले आहे.
advertisement
6/9
हे आलिशान घर पाहून समंथा खूपच आनंदी झाली. या घराची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे, मात्र कपलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
advertisement
7/9
समंथा आणि राज या दोघांनाही आयुष्यात दुसरी संधी स्वीकारली आहे. समंथाने २०१७ मध्ये नागा चैतन्य यांच्याशी लग्न केले होते आणि २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर, राज निदिमोरू यांचाही श्यामली डे यांच्यासोबतचा संसार २०२२ मध्ये तुटला होता.
advertisement
8/9
'सिटाडेल' वेब सिरीजवर एकत्र काम करत असताना समंथा आणि राज एकमेकांच्या प्रेमात पडले. सिटाडेलच्या शूटिंगदरम्यान समंथाची तब्येत ठीक नसताना राजने तिची खूप काळजी घेतली, ज्यामुळे ते एकमेकांच्या अधिक जवळ आले.
advertisement
9/9
घटस्फोटाचा अनुभव घेतल्यानंतर आता समंथा आणि राज यांनी मोठ्या थाटात आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी गुपचूप उरकलं लग्न, आता राज निदिमोरुकडून समंथाला महागडं गिफ्ट, किंमत इतकी की तुम्ही कधी विचारही केला नसेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल