IND vs SA : 50 ओव्हर बॉलिंग केली, पण 17.2 ओव्हरलाच भारताचा पराभव, 'हा' ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. 358 इतकी बलाढ्य धावसंख्या उभारून देखील साऊथ आफ्रिकेने हे भलं मोठं लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
advertisement
1/5

रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. 358 इतकी बलाढ्य धावसंख्या उभारून देखील साऊथ आफ्रिकेने हे भलं मोठं लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
advertisement
2/5
त्याचं झालं असं की साऊथ आफ्रिकेच्या डावाच्या सूरूवातीला क्विंटन डिकॉकची विकेट पडली होती.त्यानंतर एडम मार्करम आणि टेम्बा बावुमाने डाव सावरला होता. यावेळी मार्करम अर्धशतक करून चांगल्या लयीत असतान बाऊंन्ड्री लाईनवर जयस्वालने त्याची कॅच ड्रॉप केली होती.
advertisement
3/5
विशेष म्हणजे ज्यावेळेस जयस्वालने कॅच ड्रॉप केली त्यावेळेस मार्करम 53 धावांवर खेळत होता.त्यामुळे कॅच ड्रॉपमुळे मिळालेल्या जीवनदानानंतर मार्करमने पुढे जाऊन 110 धावांची शतकीय खेळी केली.
advertisement
4/5
याचाच अर्थ त्या एका कॅच ड्रॉपमुळे मार्करमने आणखी 57 अतिरीक्त धावा काढल्या होत्या.याच अतिरीक्त धावा टीम इंडियाला या सामन्यात पुढे जाऊन भारी पडल्या.
advertisement
5/5
विशेष म्हणजे यशस्वी जयस्वाल सध्या आऊट ऑफ फ़ॉर्म दिसतो आहे.त्याने दोन्ही वनडे सामन्यात फारशा इतक्या सन्मानजनक धावा केल्या नाहीयेत आहे.त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 50 ओव्हर बॉलिंग केली, पण 17.2 ओव्हरलाच भारताचा पराभव, 'हा' ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट