TRENDING:

नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी दमले, निघाला घाम, अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड, पाहा PHOTO

Last Updated:
जिकडे पाहावे तिकडे पैसेच पैसे, मोजायला मशीन मागवाव्या लागल्या, पैशांची थप्पी मोजून मशीन गरम झाल्या, अधिकारी थकले पण मोजून काही होईना अशी अवस्था झाली. एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरात 1.44 कोटींहून अधिक रुपयांचं घबाड सापडलं आहे.
advertisement
1/10
नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी दमले, निघाला घाम, अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
रेड सिनेमा पाहिला असेल, रेड 2 देखील पाहिला असेल तसाच प्रकार एक अधिकाऱ्याच्या घरी घडला आहे. सिनेमापेक्षाही खतरनाक असा सीन, पैशांचं भलंमोठं घबाड तेही कॅशमध्ये, 100, 200, 500 रुपयांच्या नोटांची बंडल पाहून डोळे पांढरे होतील.
advertisement
2/10
नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी दमले, निघाला घाम, अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
जिकडे पाहावे तिकडे पैसेच पैसे, मोजायला मशीन मागवाव्या लागल्या, पैशांची थप्पी मोजून मशीन गरम झाल्या, अधिकारी थकले पण मोजून काही होईना अशी अवस्था झाली. एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरात 1.44 कोटींहून अधिक रुपयांचं घबाड सापडलं आहे.
advertisement
3/10
ओडिशात भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला गती देत, राज्य दक्षता विभागाने शुक्रवारी जयपूर वनक्षेत्राचे डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपक यांच्या सहा ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या छाप्यात 1.44 कोटी रोख रक्कम तसेच सोन्याचे बिस्किट आणि नाणी जप्त करण्यात आली.
advertisement
4/10
जयपूरच्या विशेष दक्षता न्यायालयातून प्राप्त झालेल्या शोध वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ डीएसपी, ५ इन्स्पेक्टर, ९ एएसआय यांच्यासह एक मोठी टीम तैनात करण्यात आली होती. शुक्रवार सकाळी जयपूर आणि भुवनेश्वर येथील नेपक यांच्या विविध परिसरांवर छापमारीला सुरुवात झाली.
advertisement
5/10
छापेमारी करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये खालील ठिकाणांचा समावेश आहे. १. एनकेटी रोड, पीआर पेटा येथील जयपूर टाऊन, कोरापुट येथील वडिलोपार्जित घर इतक्यावरच अधिकारी थांबले नाहीत तर सासरवडीसकट अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
advertisement
6/10
फ्लॅट नंबर ५१०, गोल्डन हाईट्स, पीआर पेटा, जयपूर. फ्लॅट नंबर ५११, गोल्डन हाईट्स, पीआर पेटा, जयपूर, भावाचा फ्लॅट, यूएमएस भगवती मॅन्शन, रघुनाथपूर, भुवनेश्वर, सोमबार टोला, जयपूर टाऊन येथील सासरवाडी, जयपूर फॉरेस्ट रेंज कार्यालय या ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
advertisement
7/10
या सहा ठिकाणांवरील छाप्यात, फ्लॅट नंबर ५१० मध्ये ‘कुबेराचा खजिना’ सापडला, जिथे एका गुप्त ठिकाणाहून ₹१.४ कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रोख रक्कम लपवून ठेवण्यात आली होती, जी दक्षता पथकाने शोधून काढली. नंतर मोजणी केल्यावर जप्त केलेल्या रोख रकमेची एकूण रक्कम ₹१.४४ कोटी झाली.
advertisement
8/10
याच फ्लॅट नंबर ५१० मधून सोन्याचे ४ बिस्किट आणि १०-१० ग्रॅमची १६ सोन्याची नाणी देखील जप्त करण्यात आली आहेत. या वस्तूंचे एकूण वजन आणि मूल्यांकन अजूनही सुरू आहे. दक्षता पथक या मौल्यवान वस्तूंच्या वैधतेचीही चौकशी करत आहे.
advertisement
9/10
डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपक यांच्यावर उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचा आरोप आहे. त्यांच्या वेतनश्रेणीतील उत्पन्नाच्या तुलनेत जप्त केलेली संपत्ती खूप जास्त आढळली आहे. दक्षता विभाग बँक खाती, मालमत्ता संबंधित कागदपत्रे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करत आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
advertisement
10/10
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ही छापेमारी भ्रष्टाचाराविरोधातील आमच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. सध्या तपास सुरू असून, सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी दमले, निघाला घाम, अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड, पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल