TRENDING:

photos : पिवळ्या साडीतली ग्लॅमरस निवडणूक अधिकारी आठवली का? आता कुठे लागली त्यांची ड्यूटी..

Last Updated:
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, बूथ पासून ईव्हीएम घेऊन जाताना पिवळी साडी घातलेली एका महिला अधिकाऱ्याचा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. 2022 विधानसभा निवडणुकीतही त्यांना मोहनलालगंज येथील बूथवर पाहिले गेले होते. या महिला अधिकाऱ्याची आता पुन्हा चर्चा होत आहे. रीना द्विवेदी असे त्यांचे नाव आहे. त्यांची ड्युटी आता कुठे लागली आहे, ते जाणून घेऊयात. (अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी)
advertisement
1/6
photos : पिवळ्या साडीतली ग्लॅमरस निवडणूक अधिकारी आठवली का? आता कुठे त्यांची...
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, पिवळी साडी घातलेली महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर लोकांमध्ये या महिलेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांचा खूप शोध घेतला. आता पुन्हा एकदा पिवळी साडी घातलेली ही महिला निवडणूक ड्युटीवर कुठे आहे याची उत्सुकता लोकांना लागली आहे.
advertisement
2/6
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल पाहायला मिळाला. लोक आता त्यांच्यासोबत सेल्फी घेतात आणि पिवळ्या साडीवाली मॅडम असे म्हणतात. भारतीय पोशाख असो किंवा वेस्टर्न ड्रेस, त्यांना जे आवडते, त्या ते परिधान करतात. त्यांचा लूकही लोकांना खूप आवडतो.
advertisement
3/6
रीना द्विवेदी यांनी सांगितले की, फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना भोजपुरी चित्रपटातील अनेक ऑफर आल्या होत्या. तसेच मॉडलिंगच्याही खूप ऑफर आल्या होत्या. मात्र, त्यांनी सर्व ऑफर नाकारल्या.
advertisement
4/6
रीना द्विवेदी या लखनऊच्या गोमती नगर येथे राहतात. तसेच त्या सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यांना एक मुलगा असून तो त्यांच्यासोबत गोमतीनगर येथे राहतो. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.
advertisement
5/6
त्यांनी सांगितले की, अजून बूथ ठरलेला नाही. 20 एप्रिलनंतर एक लिस्ट येईल. त्यानंतर त्यांची ड्युटी कुठे आणि कोणत्या बूथवर लागली आहे, याबाबत माहिती मिळेल.
advertisement
6/6
रीना द्विवेदी यांचा ग्लॅमरस लुक लोकांना खूप आवडतो. इंस्टाग्रामवरही लोक त्यांना फॉलो करतात. रीना द्विवेदी त्यांच्या नवीन लूकने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. रीना ट्रेंड फॉलो करतात आणि त्या ट्रेंडनुसार त्यांचे कपडे तयार करून घेतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
photos : पिवळ्या साडीतली ग्लॅमरस निवडणूक अधिकारी आठवली का? आता कुठे लागली त्यांची ड्यूटी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल