TRENDING:

पैसे मोजता मोजता अधिकारी थकले, पण नोटा संपण्याचं नाव घेईना, कुठे सापडलं 2,000,00,000 रुपयांचं घबाड?

Last Updated:
EDच्या गंजाम जिल्ह्यातील छाप्यात हृषिकेश पाढी यांच्या घरात २ कोटींच्या नोटा, महागड्या गाड्या आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त, वाळू तस्करी प्रकरणात मोठा खुलासा.
advertisement
1/6
पैसे मोजून अधिकारी थकले, पण नोटा संपेना, कुठे सापडलं 2,000,00,000 रुपयांचं घबाड?
ED ने टाकलेल्या धाडीमुळे खळबळ उडाली, कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्यानंतर जे काही दृश्यं दिसलं ते पाहून अधिकाऱ्यांचे डोळेच फिरले. एक दोन नाही तब्बल संपूर्ण कपाट भरून पैशांची थप्पी लावली होती. असे दोन कोटी रुपयांच्या नोटा सापडल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
2/6
बेकायदेशीर वाळू उपसा आणि गौण खनिजांच्या तस्करीप्रकरणी झालेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांच्या हाती घबाड लागले आहे. चक्क नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटे पाहून तपास अधिकारीही थक्क झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही कारवाई बीजू जनता दलाचे नेते आणि मोठे कंत्राटदार हृषिकेश पाढी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर करण्यात आली आहे.
advertisement
3/6
ईडीच्या पथकाने जेव्हा या प्रकरणातील संशयितांच्या घरावर छापा टाकला, तेव्हा त्यांना घरातील कपाटांमध्ये कपड्यांऐवजी ५०० आणि २००० च्या नोटांची पुडकी गच्च भरलेली आढळली. आतापर्यंत २ कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, पैशांची मोजणी अजूनही सुरू आहे. रोख रकमेसोबतच महागड्या गाड्या आणि मालमत्तेची कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत.
advertisement
4/6
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात ही छापेमारी करण्यात आली. अनेक बड्या वाळू माफियांनी स्वतःचे नाव लपवण्यासाठी चक्क पान टपरी चालक, मिठाईचे दुकानदार आणि ट्रॅक्टर चालकांच्या नावाने वाळूचे ठेके घेतले होते. या नावांचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात होता. गंजाम जिल्ह्यातील ऋषिकुल्या आणि बाहुडा नद्यांच्या पात्रातून बेसुमार अवैध उपसा करून सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावल्याचे 'कॅग'च्या अहवालातही समोर आलं.
advertisement
5/6
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवैध व्यवसायात काही स्थानिक गुंड आणि बाहुबलींचाही समावेश आहे. हे लोक सर्वसामान्य नागरिकांना धमकावून आणि दहशतीचा वापर करून नद्यांमधून वाळू आणि दगड काढण्याचे काम जबरदस्तीने करून घेत होते. राजकीय वरदहस्त असल्याने आजवर या माफियांचे फावले होते, मात्र ईडीच्या एन्ट्रीने आता त्यांचे धाबे दणाणले आहेत.
advertisement
6/6
हृषिकेश पाढी हे जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या बरहामपूर, लांजीपल्ली आणि जयप्रकाश नगर येथील निवासस्थानांसह एकूण २० ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येत असून, या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
पैसे मोजता मोजता अधिकारी थकले, पण नोटा संपण्याचं नाव घेईना, कुठे सापडलं 2,000,00,000 रुपयांचं घबाड?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल