दिल्लीच्या दिशेने टाकलेल्या मिसाईलचे उद्ध्वस्त तुकडे सापडले, घटनास्थळी पोलीस पोहोचले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pakistani Fatah-II : पाकिस्तानाने दिल्लीवर 'फतेह 2' हे मिसाईल सोडलं होतं. हे मिसाईल भारताने आज पहाटेच्या वेळी निकामी केले. फतेह-२ मिसाईलचे तुकडे हरयाणाच्या शिरसा भागांत आढळून आले.
advertisement
1/7

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची आग आता आणखी भडकली आहे. पाकिस्तानकडून सतत ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा अंधारात पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले.
advertisement
2/7
यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले हाणून पाडले. दरम्यान, पाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
3/7
सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानाने दिल्लीवर 'फतेह 2' हे मिसाईल सोडलं होतं. मात्र भारताने हा हल्ला परतवून लावला. या मिसाईलला भारताने सिरसा परिसरात रोखलं. पाकिस्तानच्या फतेह-II या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची षमता सुमारे ४०० किलोमीटर आहे.
advertisement
4/7
शुक्रवार मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला. पाकिस्तानी सैन्यांचे तीन एअरबेस उडवल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर पाकिस्तान चवताळला असून पाकने भारताविरोधात 'बुनियान उल मर्सूस' ऑपरेशन सुरू केलं आहे.
advertisement
5/7
पाकिस्तानाने दिल्लीवर सोडलेले 'फतेह 2' या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या सब्जी मंडीजवळील खाजा खेडा या शेतशिवारात सापडले. उद्ध्वस्त मिसाईलचे तुकडे पाहण्यासाठी स्थानिक आणि बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
advertisement
6/7
मिसाईलचे तुकडे शेतात मिळाल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मिसाईलच्या तुकड्यांची पाहणी करून ते जवळील पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत.
advertisement
7/7
पाकिस्तानने दिल्लीसह जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या विविध भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
दिल्लीच्या दिशेने टाकलेल्या मिसाईलचे उद्ध्वस्त तुकडे सापडले, घटनास्थळी पोलीस पोहोचले