Independence Day: पांढरा कुर्ता-अन् डोक्यावर भगवा फेटा, पीएम मोदींचा खास लूक, लाल किल्ल्यावरचे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
देशभरात 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. पीएम मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केलं. त्यांनी पांढरा कुर्ता-पायजमा, अबोली जॅकेट आणि भगवा फेटा परिधान केला होता.
advertisement
1/6

देशभरात 79 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा हटके लूक पाहायला मिळाला. त्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित केलं.
advertisement
2/6

आजच्या स्वातंत्र्य दिनासाठी पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता-पायजमा, त्यावर अबोली रंगाचं जॅकेट आणि भगवा फेटा परिधान असा लूक केला होता.
advertisement
3/6
त्यांनी साध्या पांढऱ्या रंगाच्या कुडत्यावर केशरी रंगाचे नेहरू जॅकेट घातले होते, आणि सोबत एक गमछाही घेतला होता. हा पारंपरिक पण आधुनिक लूक खूपच आकर्षक दिसत होता.
advertisement
4/6
लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले आणि आदरांजली वाहिली. त्या वेळीही त्यांचा हा खास पेहराव दिसून आला.
advertisement
5/6
राजघाटावरून त्यांचा पहिला लूक समोर आल्यानंतर, अनेकांनी त्यांच्या पेहरावाची प्रशंसा केली.पंतप्रधान मोदी नेहमीच त्यांच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असतात.
advertisement
6/6
विशेषतः स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर त्यांचे जॅकेट आणि पगड्यांचे खास कलेक्शन नेहमीच चर्चेचा विषय ठरले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Independence Day: पांढरा कुर्ता-अन् डोक्यावर भगवा फेटा, पीएम मोदींचा खास लूक, लाल किल्ल्यावरचे PHOTO