फोटोग्राफर ते फुटबॉलपटू कोण आहे प्रियांका गांधी यांची होणारी सून?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वाड्रा कुटुंबात वाजणार लग्नाची सनई! प्रियांका गांधींचा लेक रेहान लवकरच चढणार बोहल्यावर; पाहा कोण आहे वाड्रा घराण्याची होणारी सून?
advertisement
1/8

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार सभांचा धुरळा रंगात आला आहे. तर दुसरीकडे गांधी घराण्यात आनंदाचं वातावरण आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांच्या कुटुंबात सध्या चर्चा फक्त लग्नाची होत आहे. प्रियांका गांधी यांच्या मुलाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे. आता लग्न कुठे होणार, तारीख काय असेल? वाड्रा आणि गांधी घराण्यात येणारी सून कोण आहे याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
advertisement
2/8
प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याच्या लग्नाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. रेहानने त्याची जुनी मैत्रीण अवीवा बेग हिला लग्नासाठी मागणी घातली आणि अवीवानेही त्याला हसतमुखाने होकार दिला. गेल्या सात वर्षांपासून एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेणाऱ्या या जोडीने आता कायमचं एकत्र चालण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
3/8
रेहान आणि अवीवा या दोघांच्या स्वभावात आणि छंदात खूप साम्य आहे. रेहान यांना राजकारणापेक्षा फोटोग्राफी आणि कलेची अधिक ओढ आहे, तर अवीवा देखील व्यवसायाने फोटोग्राफर आहे. याच सामायिक आवडीमुळे दोघांची मैत्री घट्ट झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं.
advertisement
4/8
अवीवा ही मूळची दिल्लीचीच असून दोघांनीही आपला साखरपुडा अत्यंत खासगी ठेवला होता. फक्त कुटुंबातले मोजकेच लोक या सोहळ्याचे साक्षीदार होते. या दोघांची आता सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
advertisement
5/8
सूत्रांच्या माहितीनुसार, रेहान आणि अवीवा यांचं लग्न राजस्थानमधील रणथंभौरमध्ये पार पडणार आहे. प्रियांका गांधी आपल्या कुटुंबासह सवाई माधोपूरला पोहोचल्या असून तिथे लग्नाच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचं समजतंय.
advertisement
6/8
रणथंभौरचं निसर्गसौंदर्य आणि तिथली शांतता गांधी कुटुंबाला नेहमीच प्रिय राहिली आहे, त्यामुळे लेकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण साजरा करण्यासाठी याच ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. सात वर्षांची मैत्री नंतर प्रेम आणि आता लग्न यामुळे दोघांची चर्चा सध्या होत आहे.
advertisement
7/8
25 वर्षांचे रेहान यांची विज्युअल आर्टिस्ट म्हणून ओळख आहे. त्यांनी दिल्ली आणि लंडनमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. राजकारणात येण्याऐवजी त्यांनी आपल्या कलेला प्राधान्य दिलं. 'डार्क परसेप्शन' नावाचं त्यांचं आर्ट एक्झिबिशन प्रचंड गाजलं होतं. कॅमेऱ्याच्या नजरेतून जग पाहणाऱ्या रेहान यांना आता अवीवाच्या रूपात आयुष्यभराची साथ मिळाली आहे.
advertisement
8/8
वाड्रा कुटुंबाची होणारी सून अवीवा ही सुद्धा आर्ट आणि फोटोग्राफी क्षेत्रात सक्रिय आहे. रेहान आणि अवीवा गेली सात वर्षं एकमेकांना ओळखतात. अवीवाच्या साधेपणामुळे आणि तिच्या कलात्मक दृष्टिकोनामुळे ती गांधी-वाड्रा कुटुंबात चटकन मिसळून गेली आहे. याशिवाय ती नॅशनल फुटबॉल प्लेअर देखील असल्याचं सांगितलं जात आहे.