एका अफवेनंतर प्रवाशांनी ट्रेनमधून धडाधड मारल्या उड्या, अनेकांचा मृत्यू, घटनास्थळाचे Photo
- Published by:Shreyas
Last Updated:
झारखंडच्या जामताडामध्ये ट्रेन अपघात झाला आहे. जामताडा-करमाटांडच्या कलझारियाजवळ ट्रेनखाली आल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत.
advertisement
1/4

मिळालेल्या माहितीनुसार डाऊन लाईनहून बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस जात होती, तेव्हा लाईनच्या बाजूला टाकलेल्या मातीमुळे धूळ उडत होती. धूळ पाहून ड्रायव्हरला आग लागल्याचं वाटलं, त्यामुळे त्याने ट्रेन थांबवली.
advertisement
2/4
ट्रेन थांबल्यानंतर प्रवासी उतरले तेव्हाच दुसऱ्या ट्रॅकवरून ईएमयू ट्रेन येत होती, या ट्रेनच्या खाली आल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.
advertisement
3/4
अंग एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचं समजल्यानंतर प्रवाशांनी धावपळ करायला सुरूवात केली आणि त्यांनी ट्रेनमधून खाली उडी मारली, त्याचवेळी बाजूने पॅसेंजर ट्रेन जात होती आणि हा अपघात झाला.
advertisement
4/4
दुसरीकडे रेल्वेने मात्र चेन पुलिंगमुळे ट्रेन थांबवल्याचं सांगितलं आहे. ट्रेन पुलिंग करून काही जण ट्रॅक पार करत होते आणि समोरून येणाऱ्या ट्रेनखाली चिरडले गेले, असा दावा रेल्वेने केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
एका अफवेनंतर प्रवाशांनी ट्रेनमधून धडाधड मारल्या उड्या, अनेकांचा मृत्यू, घटनास्थळाचे Photo