Gujarat Bridge Collapse: एका क्षणात पुलाचे दोन तुकडे, ट्रक हवेत लटकला, घटनास्थळावरचे हे 9 PHOTO पाहून उडेल थरकाप
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Gujarat Bridge Collapse: वडोदरा-आनंदला जोडणारा 43 वर्ष जुना पूल कोसळला, दोन जणांचा मृत्यू, पाच जणांना वाचवले. पुलाच्या कोसळण्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. प्रशासन घटनास्थळी.
advertisement
1/9

हे फोटो पाहताच क्षणी सावित्री पूल दुर्घटनेचं चित्र डोळ्यासमोर उभं राहील. इतकी भयंकर दुर्घटना महाराष्ट्राजवळ गुजरात राज्यात घडली आहे. वडोदरा आणि आणंदला जोडणारा 43 वर्ष जुना पूल कोसळला आहे. या पूलाचे थेट दोन तुकडे झाले आहेत.
advertisement
2/9
या पूलाच्या मधला भाग अचानक कोसळला आणि अनेक गाड्या वाहानं नदीत कोसळली आहेत. या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.एक ट्रक थोडक्यात बचावला आहे. तो अर्धा हवेत लटकला तर अर्धा ब्रिजवर राहिला होता.
advertisement
3/9
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. महिसागर नदीवरील वडोदरा-आनंदला जोडणारा पूल अचानक मध्यभागी तुटला.
advertisement
4/9
या वर्दळीच्या पुलाच्या कोसळण्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. प्राथमिक माहितीनुसार, या वर्दळीच्या पुलाच्या कोसळण्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जणांना वाचवण्यात आले आहे.
advertisement
5/9
महिसागर नदीवरील वडोदरा-आनंद जिल्ह्याला जोडणारा हा पूल मध्य गुजरातमध्ये खूप महत्त्वाचा आहे. पद्राजवळ बांधलेल्या या पुलावर बरीच वाहतूक असते.
advertisement
6/9
बुधवारी सकाळी ८:३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. ट्रक, बाईक, कार इत्यादी पुलावरून जात होते. त्यानंतर अचानक मध्यभागी एक मोठा भाग कोसळला. त्या भागात असलेली वाहने नदीत पडली.
advertisement
7/9
प्रत्यक्षदर्शींच्या मते, पूल कोसळल्याने दोन ट्रक, एक ऑटो रिक्षा आणि एक इको नदीत पडताना दिसले. एक ट्रक तोंडाशी अडकला. स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.
advertisement
8/9
पाच जणांना जिवंत वाचवण्यात आले, ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
9/9
पोलीस, अग्निशमन दल आणि डायव्हिंग टीम नदीत लोकांचा शोध घेत आहेत. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Gujarat Bridge Collapse: एका क्षणात पुलाचे दोन तुकडे, ट्रक हवेत लटकला, घटनास्थळावरचे हे 9 PHOTO पाहून उडेल थरकाप