29000 कोटींची संपत्ती, अमेरिकेत मुलाचा अचानक मृत्यू, वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी घेतला मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Vedanta Group Anil Agarwal Family: वेदांता ग्रुप के चेयरमैन अनिल अग्रवाल के बेटे का अमेरिका में निधन हो गया. उन्होंने खुद फेसबुक पोस्ट के जरिए दुखद समाचार दिया. जानें, उनकी फैमिली में कौन-कौन हैं.
advertisement
1/7

२९ हजार कोटी डॉलर्सच्या अवाढव्य 'वेदांता' साम्राज्याचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यावर नियतीने क्रूर आघात केला आहे. ज्या मुलाने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात प्रगती केली, त्याच ४९ वर्षीय अग्निवेश अग्रवाल यांचे ७ जानेवारी रोजी न्यूयॉर्कमध्ये निधन झाले. "हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस आहे," अशा शब्दांत अग्रवाल यांनी आपला पुत्रशोक व्यक्त केला आहे.
advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवेश अग्रवाल आपल्या मित्रासोबत अमेरिकेत 'स्कीइंग' (Skiing) करत होते. खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली आणि तातडीने न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ते सावरतील अशी आशा होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
advertisement
3/7
३ जून १९७६ रोजी बिहारच्या पाटणा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात अग्निवेश यांचा जन्म झाला होता. अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले अग्निवेश केवळ एक उद्योजक नव्हते, तर ते उत्तम बॉक्सिंग चॅम्पियन आणि संगीतप्रेमीही होते.
advertisement
4/7
वेदांता समूहाच्या उपकंपन्यांमध्ये ते अत्यंत सक्रिय होते, विशेषतः 'तलवंडी साबो पॉवर लिमिटेड'च्या बोर्डावर त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांची बहीण प्रिया अग्रवाल-हेब्बर या सध्या हिंदुस्थान झिंकच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.
advertisement
5/7
अनिल अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये मुलासोबत पाहिलेल्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे. "आम्ही दोघांनी मिळून 'स्वावलंबी भारताचे' स्वप्न पाहिले होते. मी अग्निवेशला एक वचन दिले होते की, आपल्याकडे जेवढं धन येईल त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक भाग समाजकार्यासाठी खर्च करू.
advertisement
6/7
आज माझा मुलगा आपल्यात नसला, तरी त्याचे स्वप्न आणि हे वचन मी मोडणार नाही. इथून पुढचे माझे आयुष्य अधिक साधेपणाने असेल आणि तो पैसा समाजहितासाठीच वापरला जाईल," असा ऐतिहासिक निर्णय अग्रवाल यांनी पुन्हा बोलून दाखवला आहे.
advertisement
7/7
अनिल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अग्निवेश हा केवळ त्यांचा मुलगा नव्हता, तर त्यांचा जिवलग मित्र आणि जग होता. एकीकडे संपत्तीचे शिखर आणि दुसरीकडे मुलाचा विरह अशा कात्रीत आज अग्रवाल कुटुंब सापडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी किरण अग्रवाल, मुलगी प्रिया आणि आई-वडील असा परिवार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
29000 कोटींची संपत्ती, अमेरिकेत मुलाचा अचानक मृत्यू, वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी घेतला मोठा निर्णय