पायलच्या प्रेमाने घेतला जीव! इन्स्टावर ओळख, बायकोच्या जाळ्यात अडकला अन् घात झाला, जंगलात बोलवून…
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा खून त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच केल्याचं उघड झालं आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून संबंधित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
advertisement
1/7

रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील पाबळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली.
advertisement
2/7
या गुन्ह्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून संबंधित व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याला भेटायला बोलवून त्याची जंगलात नेऊन हत्या केली. आरोपींनी हत्येची कबुली दिली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
advertisement
3/7
कृष्णा खंडवी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो पेण तालुक्यातील गौळवाडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश महाकाळसह अन्य आरोपींना अटक केली आहे.
advertisement
4/7
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा खंडवी यांचा विवाह दीपाली हिच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच दीपालीचं उमेश महाकाळ नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रेमसंबंध सुमारे दोन वर्षांपासून सुरू होते.
advertisement
5/7
दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण कृष्णा हा दोघांच्या लग्नात अडसर ठरत होता. यामुळे आरोपींनी कृष्णाला कायमस्वरूपी दूर करण्याचा कट रचला. आपल्या या क्रूर कटासाठी दीपाली आणि उमेश यांनी एक वेगळीच शक्कल लढवली.
advertisement
6/7
त्यांनी सुप्रिया चौधरी नावाच्या मैत्रिणीच्या मदतीने इन्स्टाग्रामवर 'पायल' या नावाने एक बनावट अकाउंट तयार केले. या कथित 'पायल'च्या माध्यमातून आरोपींनी कृष्णा खंडवी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
advertisement
7/7
प्रेमसंबंधाच्या नावाखाली 'पायल'ने कृष्णाला नागोठणे येथे भेटायला बोलावले. कृष्णा तिथे आल्यानंतर, दीपाली, उमेश आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला वासगाव येथील निर्जन जंगलात नेऊन निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
पायलच्या प्रेमाने घेतला जीव! इन्स्टावर ओळख, बायकोच्या जाळ्यात अडकला अन् घात झाला, जंगलात बोलवून…