TRENDING:

Latur accident : लातूरमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स पलटी, photos

Last Updated:
लातूरमधून भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल्स आधी डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर पटली झाली.
advertisement
1/5
लातूरमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स पलटी, photos
लातूरमधून भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल्स आधी डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर पटली झाली. या ट्रॅव्हल्समध्ये 16 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
2/5
सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, या ट्रॅव्हल्समधून 16 प्रवासी प्रवास करत होते, त्यातील सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आरटीओ कार्यालयाजवळच हा अपघात झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
3/5
अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स लातूरहून निलंग्याला निघाली होती. लातूरच्या आरटीओ कार्यालय परिसरात ही ट्रॅव्हल्स रोड डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स पटली झाली. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहेत, ट्रॅव्हल्सचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
4/5
अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर ट्रॅव्हल्स डिव्हायडरला धडकली. डिव्हायडरला धडकल्यानंतर ही ट्रॅव्हल्स पलटी झाली.
advertisement
5/5
या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सचं देखील मोठं नुकसान झालं आहे. समोरच्या भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीपीच्या मदतीनं उलटी झालेली ट्रॅव्हल्स सरळ करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Latur accident : लातूरमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स पलटी, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल