Gold Price: गौरी पूजनाला पुण्यात सोन्याचे दर वाढले, 1 ग्रॅमसाठी तब्बल मोजावे लागणार एवढे रुपये
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Gold Price: गणेशोत्सव आणि गौरी आगमन आनंदाने साजरं केलं जात आहे. नागरिकांमध्ये सणासुदीच्या खरेदीचा उत्साह दिसत आहे. भारतामध्ये सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं. यंदा सोने-चांदीच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी ग्राहकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. उलट सराफ बाजार ग्राहकांनी गजबजून गेला आहे.
advertisement
1/5

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतात सोने आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत आहेत.
advertisement
2/5
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी तब्बल 1,05,880 रुपये इतका झाला आहे. कालच्या तुलनेत या दरात 930 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अधिक खर्च करावा लागत आहे. सध्या 1 ग्रॅम सोन्याचा दर 10,588 रुपये इतका झाला आहे. या दरवाढीनंतरही ग्राहक खरेदीसाठी उत्सुक असून अनेक ठिकाणी सराफ दुकानं गर्दीने फुलली आहेत. .
advertisement
3/5
चांदीबाबत बोलायचं झालं, तर चांदीच्या किंमतींमध्येही मोठी उसळी दिसून आली. आज बाजारात 1 किलो चांदीसाठी 1,26,000 रुपये दर नोंदवला गेला आहे. कालच्या तुलनेत यात तब्बल 1000 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांना सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
advertisement
4/5
गौरी-गणपती आणि पुढील नवरात्र-दिवाळीचे मुहूर्त लक्षात घेता, पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर वाढत असले तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. ग्राहकांच्या या उत्साहामुळे व्यापाऱ्यांमध्येही सकारात्मक वातावरण आहे
advertisement
5/5
व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि सणासुदीचा हंगाम यामुळे सोने-चांदीची मागणी वाढत आहे. गुंतवणूकदारांसाठीही सोनं आणि चांदी आकर्षण ठरत आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक ग्राहक आधीच खरेदी करत आहेत, तर काहीजण आगामी शुभमुहूर्ताची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Gold Price: गौरी पूजनाला पुण्यात सोन्याचे दर वाढले, 1 ग्रॅमसाठी तब्बल मोजावे लागणार एवढे रुपये