Pune Rain Update: मुसळधार पावसाने पुण्याला झोडपलं, पुढील दोन दिवस रेड अलर्ट, बघा Photo
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Rain Update: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याच्या विविध भागात थैमान घातलं आहे. आज (मंगळवार, 19 ऑगस्ट) सकाळपासून पुण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहराचा मध्यवर्ती भाग, उपनगरे आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

मंगळवार सकाळपासूनच पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि आसपासच्या भागात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पुणे वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/6
शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. उपनगरातही पावसाचा जोर तितकाच आहे. या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
3/6
पावसामुळे शहरातील वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि कार्यालयात जाणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. रेल्वे आणि विमानसेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
4/6
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तास पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यानंतर देखील पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नाहीत. समुद्रातील दाब कमी झाल्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
advertisement
5/6
कर्वेनगर, कोथरूड, डेक्कन, स्वारगेट, सिंहगड रोड परिसरात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे.
advertisement
6/6
पुढील दोन दिवस पुणे आणि आसपासच्या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहावे, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, असं आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Pune Rain Update: मुसळधार पावसाने पुण्याला झोडपलं, पुढील दोन दिवस रेड अलर्ट, बघा Photo