TRENDING:

पुण्याच्या 10वी पास शेतकऱ्याने भंगारातून बनवली विंटेज इलेक्ट्रिक कार, 'एलन मस्क'लाही सुचलं नसेल!

Last Updated:
आपली स्वतःची गाडी असावी, आपणही हक्काच्या चारचाकीतून फिरावं असं जवळपास प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं. अनेकांसाठी हे स्वप्न स्वप्नच राहतं, तर काहीजण मात्र मोठ्या जिद्दीने ते पूर्ण करतात. अशीच एक यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5
शेतकऱ्याने भंगारातून बनवली विंटेज इलेक्ट्रिक कार, एलन मस्कलाही सुचलं नसेल!
हे आहे रोहिदास नवघणे यांचं कुटुंब. वडगाव (मावळ)च्या जांभूळवाडीचे रहिवासी. उदरनिर्वाहाचं साधन शेती, मात्र त्यांनी अशी कमाल करून दाखवली जी भल्याभल्यांना जमत नाही. मुख्य म्हणजे ते काही इंजिनिअर नाहीत किंवा त्यासंबंधातील शिक्षणही त्यांनी घेतलेलं नाही. तर ते केवळ दहावी पास आहेत.
advertisement
2/5
आपल्याकडे विंटेज कार असावी असं स्वप्न रोहिदास नवघणे यांनी पाहिलं होतं. घरची परिस्थिती बेताची होती, कार काय सायकल खरेदी करणंही त्यांना शक्य नव्हतं.
advertisement
3/5
एकदा दिल्लीत त्यांनी ई-रिक्षा पाहिल्या. आता त्यांना काही राहवेना. घरी आल्यावर त्यांनी आपल्या स्वप्नातली विंटेज कार बनवायचीच असं ठरवलं. त्यासाठी महागडे पार्ट्स नाही तर गावातल्या भंगाराच्या दुकानातून गाडीचे साहित्य जमवले आणि कागदावर अगदी हवी तशी विंटेज कार रेखाटली. इथूनच सुरू झाला त्यांच्या गाडीचा 'विंटेज' प्रवास...
advertisement
4/5
रोहिदास यांनी अवघ्या अडीच महिन्यांत कार बनवून तयार केली. यात त्यांना त्यांच्या भावाने, मुलांनी आणि मित्राने साथ दिली. अगदी जुगाड करून बनवलेली ही लाल रंगाची कार आज रस्त्यावर लोक थांबून थांबून पाहतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर काम पूर्ण करून, विधिवत पूजा करून रोहिदास नवघणे यांनी ही कार रस्त्यावर उतरवली आणि सर्वात आधी संत तुकोबांचं दर्शन घेतलं.
advertisement
5/5
ही विंटेज कार बनवण्यासाठी काहीच पैसे लागले नाहीत असं नाही, तर तब्बल अडीच लाखांचा खर्च आला. मात्र तो नव्याकोऱ्या विंटेज कारपेक्षा फार कमी आहे. शिवाय ही कार बॅटरीवर चालणारी असून त्यात पाच बॅटऱ्या लावल्या आहेत. 5 ते 6 तास चार्ज केल्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंत आरामात चालू शकते. सध्या रस्त्यावर ही कार पाहून भलेभले विचारात पडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्याच्या 10वी पास शेतकऱ्याने भंगारातून बनवली विंटेज इलेक्ट्रिक कार, 'एलन मस्क'लाही सुचलं नसेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल